रिक्षावाल्याने तरुणीसोबत घृणास्पद कृत्य करत फरफटत नेले
फरफटत घेऊन जाण्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद, आरोपी मोकाटच
ठाणे दि १४(प्रतिनिधी)- ठाण्यात एका रिक्षावाल्याने एका तरुणीची छेड काढत तिला फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या प्रकरणी रिक्षावाल्याला विरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून ठाणे नगर पोलीस रिक्षावाल्याला शोध घेत आहेत. या प्रकारामुळे संताप व्यक्त होत आहे.
ठाणे स्टेशन रोड परिसरात सकाळीच्या सुमारास एक रिक्षावाला एका तरुणीला फरफटत घेऊन जात असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. या घटनेत तरुणी जखमी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत तरुणी कामानिमित्त जात असताना रिक्षाचालक तीची वेडेवाकडे इशारे करत छेड काढली. तरूणीने विरोध करत जाब विचारायला सुरुवात केली असता रिक्षाचालकाने त्या ठिकाणाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला,पण हा संपुर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तरुणीच्या फिर्यादीवरुन ठाणे नगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेत तरुणी जखमी झाली. तरुणीला फरफटत घेऊन जाणारा हा रिक्षाचालक पोबारा करण्यात यशस्वी झाला. काही नागरिकांना तरुणीला रूग्णालयात दाखल केले. आता रिक्षावाल्याचा शोध घेतल्यानंतर या प्रकाराचा गुंता सुटणार आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे.