Latest Marathi News
Ganesh J GIF

लुटेरी दुल्हन! महिलेने खोटे लग्न करत केली आठ तरुणांची फसवणूक

सहानुभूती मिळवत करायची लग्न आणि महिनाभरात दाखवायची प्रताप, शिक्षिकेने कोट्यवधी लुटले, असा रचायची कट

नागपूर – अभिनेत्री सोनम कपूरचा लुटेरी दुल्हन चित्रपट आपण नक्कीच पाहिला असेल. अगदी त्या चित्रपटाप्रमाणे नागपूरमध्ये एका महिलेने एक दोन नाहीतर तब्बल आठ जणांसोबत लग्न करुन फसवणूक केली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

समीरा फातिमा असे या फसवणूक करणाऱ्या महिलेच नाव आहे. विशेष म्हणजे ती एक शिक्षिका आहे. ती सोशल मिडीयाचा वापर करून अनेक विवाहित पुरूषांची फसवणूक केली आहे. स्वतःला घटस्फोटित सांगून ती सहानुभूती मिळवायची आणि म्हणायची, ‘मला आधार द्या, मी तुमची दुसरी पत्नी म्हणून राहीन.’ असे सांगून लग्न करायची आणि नंतर कोणतेही कारण सांगून भांडण करायची. आणि नंतर ब्लॅकमेल करत पैसे उकळायची. समीराने २०१० पासून आतापर्यंत ८ जणांसोबत निकाह रचला आहे. हे सगळे निकाह बनावट कागदपत्रांच्या आधारे बनवले आहेत. या आठही जणांकडे असलेली निकाहनाम्याची रंगीत प्रतही बनावट आहे. समीराने एका पीडितेकडून ५० लाख रुपये आणि दुसऱ्याकडून १५ लाख रुपये लुटले आहेत. ही रक्कम ती लग्नानंतर पतींना वेगवेगळ्या बहाण्यांनी ब्लॅकमेल करून वसूल करायची. जेव्हा जेव्हा पोलिस तिच्या अटकेपर्यंत पोहोचायचे, तेव्हा ती खोट्या गरोदरपणाचा दावा करून पळून जायची. तिने २०१० मध्ये इमरान अंसारी, २०१३ मध्ये नजमुज साकीब, रहेमान शेख, २०१६ मध्ये मिर्झा अशरफ बेग, २०१७ मध्ये मुद्दसीर मोमीन, २०१९ मध्ये मोहम्मद तारीक अनीस, २०२२ मध्ये अमानुल्लाह खान आणि गुलाम गौस पठाण यांच्याशी लग्न केले होते.

पोलिसांनी एका चहा टपरीवर अटक करत समिरा फातिमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि तिच्या संपूर्ण नेटवर्कची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात आणखी अनेक पीडित समोर येण्याची शक्यता आहे. तसेच तिच्या टोळीशी संबंधित इतर लोकांना लवकरच अटक केली जाईल, असे सांगितले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!