Latest Marathi News
Ganesh J GIF

‘भाजपामध्ये जायला पाहिजे का ? रोहित पवारांना ED चा सर्वात मोठा झटका, ‘हा’ कारखाना ईडीकडून जप्त

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामागे खंबीरपणे उभे असलेले युवा नेते तथा कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यावर ईडीने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी कारवाई केली आहे. रोहित पवार यांना एक मोठा झटका बसला आहे. कारण, आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो या कंपनीने खरेदी केलेला साखर कारखान्यावर ईडीने कारवाई केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे. ईडीने केलेली ही कारवाई म्हणजे शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी ही कारवाई केल्याचं सांगितलं जातंय. ईडीने कारवाई केलेल्या कारखान्याची किंमत 50 कोटी 20 लाख आहे. तेथील 161 एकर जमीनही ईडीकडून जप्त करण्यात आलेली आहे. रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो या कंपनीने छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड साखर कारखाना खरेदी केला होता. या साखर कारखान्याची 161.30 एकर जमीन, प्लांट, मशिनरी आणि बिल्डिंग स्ट्रक्चर्स हे जप्त केलं आहे. हा साखर कारखाना सध्या मेसर्स बारामती अॅग्रो लिमिटेडच्या ताब्यात आहे.

दरम्यान, या कारवाईनंतर रोहित पवार यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणतात की, “माझ्या कंपनीवर ED ने केलेल्या कारवाईचं ट्विट वाचलं आणि विचार आला आता भाजपामध्ये जायला पाहिजे का? पण भाजपाने लक्षात ठेवावं….झुकणारे आणि रडणारे गेले आता फक्त लढणारे शिल्लक आहेत आणि आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू! माझ्यासारख्या स्वाभिमानी मराठी माणसाला गुडघ्यावर आणण्याची स्वप्न बघणाऱ्यांनी केवळ स्वप्नच बघावीत! या कारवाईवरुन आचारसंहिता येत्या दोन-तीन दिवसांतच लागेल, हेही दिसतंय. ही कारवाई पूर्णतः बेकायदा असून याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल, त्यामुळं कर्मचाऱ्यांनी कोणतीही काळजी करु नये. पण प्रश्न इतकाच आहे की, अशी कारवाई केवळ माझ्याविरोधातच का? पण सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना आज तरी असा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही! वाढदिवसाच्या दिवशीही अशाच एका एजन्सीने कारवाई केली आणि आज महाशिवरात्रीच्या दिवशी दुसरी कारवाई… परंतु मी महादेवाचा भक्त आहे… अन्यायाविरोधात जनता जनार्दनरुपी महादेव तिसरा डोळा उघडेल तेंव्हा अनेकांच थयथयाट झाल्याशिवाय राहणार नाही.’ या आशयाचे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!