महाराष्ट्रातील माहीम विधानसभा जागेवरून सध्या राजकीय गोंधळ सुरू आहे. या जागेवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणूक लढवत आहेत. दुसरीकडे महायुतीकडून एकनाथ शिंदे यांचा पक्ष शिवसेनेचे सदा सरवणकर रिंगणात आहेत. आता उमेदवारी मागे घेतल्यास विधान परिषद आणि मंत्रीपदाचा मान राखू, असा प्रस्ताव महायुतीच्या वतीने सदा सरवणकर यांना देण्यात आला आहे. आता सरवणकर आपल्या कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेतील. सरवणकर हे गेली १५ वर्षे माहीम विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.
माहीम विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) उमेदवार सदा सरवणकर यांनी निवडणूक लढविताना सांगितले की, मी महायुतीचा उमेदवार आहे. मला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा, आठवले यांचे आशीर्वाद आहेत. मी लोकांसाठी ३६५ दिवस काम करतो. माहीम विधानसभा मतदारसंघात धनुष्यबाणाचा विजय होणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार होणार आहे. शिंदेजींचा मी ऋणी आहे. तसेच यापूर्वीही माझ्यावर कोणताही दबाव नव्हता. मला माझे कार्यकर्ते आणि मतदारांचे आभार मानायचे आहेत. मतदारांचा थोडा दबाव होता आणि शिंदे जी, फडणवीस जी, अजितदादा यांनी आमच्या मतदारांना आदर दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १० मिनिटांपू्र्वी फोन आला होता. दादरमधून धनुष्यबाण आणि बाळासाहेबांचे विचार विधानसभेत जाणं गरजेचं आहे. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी माझी इच्छा आहे. ही निवडणूक माझ्यासाठी वैयक्तिक नाही. ही निवडणूक माझ्यासाठी वैयक्तिक नाही. शिवसैनिक अहोरात्र मेहनत घेत आहेत, त्यांना विचारलं. एकनाथ शिंदेंची इच्छा आहे, मनसेने आमच्याविरुद्ध असलेले इतर सर्व उमेदवार मागे घ्यावेत, ही मी टाकलेली अट मान्य होत असेल, तर कार्यकर्त्यांशी बोलून अंतिम निर्णय कळवेन, असं सरवणकर म्हणाले.
पदाधिकाऱ्यांचे ५० ग्रुप केले आहेत. त्या सगळ्यांना बोलावलं आहे. चर्चा करून निर्णय घेऊ. एका सीटमुळे वातावरण खराब होऊ नये असं वाटतं. शिंदेंनी मला एकदाही मागे घ्यायला सांगितलेलं नाही. राज साहेबांविषयी आमच्या मनात प्रेम आहे. महायुतीचे आमदार वाढावेत, हीच इच्छा आहे. हा त्याग एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदापर्यंत न्यायला कामी येईल. मोठे निर्णय घेताना एखादा बळी जातो, असं सदा सरवणकर म्हणाले. तसेच माहिमच्या जागेवरून भाजपने अप्रत्यक्षपणे भाजपने शिंदे गटाला इशारा देत राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांचा प्रचार करण्याची भूमिका घेतली आहे. दुसरीकडे राज ठाकरेंनी महायुतीविरोधातील उमेदवार मागे घेतले तर मी माझा अर्ज मागे घेण्यास तयार आहे, अशी अट शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांनी घातली आहे.