भारताच्या कर्णधारपदाची धुरा पुन्हा एकदा साैरव गांगुलीकडे
चाहत्यांना क्रिकेटचे जुने दिवस पुन्हा एकदा अनुभवता येणार
मुंबई दि १२ (प्रतिनिधी)- क्रिकेट चाहत्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. आहेत.कारण लीजेंड्स क्रिकेट लीगचा दुसरा हंगाम यंदा भारतात खेळवला जाणार आहे. या संघाचे नेतृत्व भारताचा स्टार कर्णधार साैरव गांगुली करणार आहे. हे सामने १६ सप्टेंबरपासून सुरु होणार आहेत.
लीगमधील पहिला सामना१६ सप्टेंबरला होणार आहे. एका विशेष सामन्याने स्पर्धेची सुरुवात होईल. १७ सप्टेंबरपासून ८ ऑक्टोबरपर्यंत भारतातील सहा शहरात या स्पर्धेतील सामने खेळवले जाणार आहेत. स्पर्धेचा विशेष सामना कोलकाताच्या ईडन गार्डनवर खेळवला जाणार आहे. इंडिया महाराजा आणि वर्ल्ड जायंट्स दरम्यान हा सामना खेळवला जाणार आहे.या लीगमध्ये यंदा दहा देशांचे खेळाडू सहभागी होणार आहेत.विशेष म्हणजे यंदाची स्पर्धा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावाला समर्पित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या वर्षी एशिया लायंस संघातून पाकिस्तानचे माजी क्रिकेटरही खेळले होते. यावर्षीही त्यांचा संघात समावेश असण्याची शक्यता आहे. पण भारत सरकार त्यांना खेळण्यास परवानगी देणार का याची उत्सुकता असणार आहे.
असे असणार संघ
इंडिया महाराजा: सौरव गांगुली (कर्णधार), वीरेंद्र सहवाग, मोहम्मद कैफ, यूसुफ पठान, एस बद्रीनाथ, इरफान पठान, पार्थिव पटेल, स्टुअर्ट बिन्नी, एस श्रीसंत, हरभजन सिंह, नमन ओझा, अशोक डिंडा, प्रग्यान ओझा, अजय जडेजा, आरपी सिंह , जोगिंदर शर्मा
वर्ल्ड जाएंट्स: इयान मॉर्गन (कर्णधार), लेंडल सिमंस, हर्शल गिब्स, जॅक्स कैलिस, सनथ जयसूर्या, मॅट प्रायर, नॅथन मैकुलम, जॉन्टी रोड्स, मुथैया मुरलीधरन, डेल स्टेन, हैमिल्टन मसाकाद्जा, मुशरफे मुर्तजा, असगर अफगान, मिशेल जॉनसन, ब्रेट ली , केविन ओ’ब्रायन, दिनेश रामदीन