मुंबई दि २२ (प्रतिनिधी)- पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले संजय राऊत यांच्या कोठडीत आज पुन्हा वाढ झाली आहे. त्यांना आता आणखीन १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यामुळे आता संजय राऊत यांचा ५ सप्टेंबरपर्यंत तुरुंगातच मुक्काम असणार आहे. त्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही.
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांना ईडीने ३१ जुलैला अटक केली होती. त्यानंतर त्यांना दोन वेळा वाढीव कोठडी सुनावण्यात आली. आज त्यांची कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. यावेळी ईडीने त्यांच्या कोठडीची मुदत वाढवण्याची मागणी केली. त्यानंतर संजय राऊत यांची कोठडी ५ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे राऊत यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. पत्राचाळ प्रकरणामुळे संजय राऊत कोठडीत आहेत यापूर्वी इडीने राऊतांची दादर आणि अलिबागमधली संपत्ती जप्त केली त्यानंतर अटकेची कारवाई केली आहे.
पत्राचाळ येथे म्हाडाचा भुखंड होता. हा भुखंड विकसित करण्यासाठी आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला काम दिले होते. पण त्यांनी ही जागा परस्पर खाजगी बिल्डरला विकली. त्यावेळी झालेल्या व्यवहारात संजय राऊतांना आर्थिक लाभ झाल्याचा ईडीला संशय आहे.