Latest Marathi News
Ganesh J GIF

पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या सरपंच सोशल मिडीयावर हिट

निर्मला नवले सोशल मिडीयावर ट्रेंडिगवर, उच्चशिक्षण युवा सरपंचांची जोरदार चर्चा

पुणे दि १६(प्रतिनिधी)- सोशल मिडीयावर कधी कोण फेमस होईल सांगता येत नाही. पण सध्या पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या सरपंच निर्मला नवले सोशल मिडीयावर तुफान फेमस आहेत. निर्मला नवले या पुणे जिल्हातील कारेगावच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंच आहेत. विशेष म्हणजे त्यांनी बीई इंजीनियरिंग केले आहे. विशेष म्हणजे त्या बिनविरोध सरपंच पदी निवडूण आल्या आहेत.

निर्मला येवले कारेगावच्या तरुण महिला सरपंच आहे. त्या सोशल मिडीयावर देखील कमालीच्या सक्रिय असतात. मध्यंतरी गायरान जमिनीवरील अतिक्रमणाच्या कारणास्तव, नवले यांना सरपंच पदावरून अपात्र ठरवण्याचा निर्णय पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता. पण या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने सरपंच निर्मला शुभम नवले पुन्हा एकदा सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. महिलांचे सबलीकरण आणि ग्रामीण भागाच्या विकासाचा ध्यास या धोरणावर त्यांनी गावचा विकास करण्याचे ध्येय ठेवले आहे. व्होकल टु ग्लोबल या विचारावर त्या गावचा विकास करण्याचा प्रयत्न करत आहेत. निर्मला नवले यांचे पती उद्योजक शुभम नवले यांचाही गावच्या सामाजिक कार्यात हिरहिरीने सहभाग राहिला आहे. निवडणूकीच्या वेळीही युवक बदल घडवू शकतात याच मुद्यावर भर दिला होता. त्यांना नारळ चिन्ह मिळाले होते आणि त्यांनीही पहिल्या प्रयत्नातच विजयाचा नारळ फोडून विजय मिळवला होता.

निर्मला नवले सोशल मिडीयावर देखील खूपच प्रसिद्ध आहेत. इन्स्टाग्रामवर देखील त्यांना हजारो फाॅलोअर्स आहेत. आपली प्रत्येक गोष्ट त्या चाहत्तांसोबत शेअर करत असतात, त्याचबरोबर गावासाठी करत असलेल्या कामांचीही माहिती त्या आपल्या सोशल मिडीया हँडेलवरुन पोहोचवत असतात सध्या त्या तुफान ट्रेंडिगवर असुन त्यांची सर्वदूर चर्चा होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!