
संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर
आषाढी वारीचे नियोजन ठरले? कधी होणार प्रस्थान, कुठे मुक्ताम, रिंगण सोहळा, पहा एका क्लिकवर
पुणे – महाराष्ट्राला मोठा आध्यात्मिक वारसा लाभलेला आहे. आणि जुन महिना सुरु झाला की सर्वांना वेध लागतात ते आषाढी पालखी सोहळ्याचे. यंदाच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून मुक्काम ठिकाण आदींचे नियोजन करण्यात आले आहे.
पालख्यांचा हा 18 दिवसांचा प्रवास असणार आहे. या वारीमध्ये गोल रिंगण, उभे रिंगण असे खेळ वारकरी खेळतात. हरिनामाचा जयघोष करत पालखी सोहळा पंढरीच्या विठोबाकडे प्रस्थान करणार आहे. यंदा मात्र दरवेळेसारखी बैलजोडीच्या मानाची परंपरा बंद करण्यात आली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी
१९ जून माऊली पालखी प्रस्थान आळंदी
२० जून आळंदी ते पुणे
२१ जून पुणे मुक्काम
२२ जून पुणे ते सासवड
२३ जून सासवड मुक्काम
२४ जून सासवड ते जेजुरी
२५ जून जेजुरी ते वाल्हे
२६ जून वाल्हे ते लोणंद,
२७ जून लोणंद ते तरडगाव
२८ जून तरडगाव ते फलटण
२९ जून फलटण ते बरड
३० जून बरड ते नातेपुते
बरड येथे गोल रिंगण
०१ जुलै नातेपुते ते माळशिरस
सदाशिवनगर येथे गोल रिंगण
०२ जुलै माळशिरस ते वेळापूर
खुडूस येथे गोळ रिंगण
०३ जुलै वेळापूर ते भंडी शेगाव
ठाकूर बुवा समाधी गोल रिंगण आणि टप्पा येथे बंधू भेट सोहळा
०४ जुलै भंडी शेगाव ते वाखरी
बाजीराव विहीर येथे उभे रिंगण
०५ जुलै वाखरी ते पंढरपूर, प्रवास व पौर्णिमेपर्यंत पंढरपूर मुक्काम
वाखरी येथे गोल रिंगण
०६ जुलै देवशयनी आषाढी एकादशी
१० जुलै पंढरपुरातून आळंदीकडे परतीचा प्रवास
संत तुकाराम महाराज पालखी
१८ जून प्रस्थान आणि इनामदार वाड्यात मुक्काम
१९ जून देहू निगडी आकुर्डी प्रवास व आकुर्डी मुक्काम
२० जून आकुर्डी ते पुणे नाना पेठ मुक्काम
२१ जून निवडुंगा विठ्ठल मंदिर पुणे मुक्काम
२२ जून पुणे हडपसर लोणी काळभोर प्रवास आणि मुक्काम
२३ जून लोणी काळभोर ते यवत प्रवास व मुक्काम
२४ जून यवत वरवंड चौफुला प्रवास व मुक्काम
२५ जून वरवंड ते उंडवडी गवळ्याची प्रवास व मुक्काम
२६ जून उंडवडी गवळ्याची ते बारामती प्रवास व मुक्काम
२७ जून बारामती काटेवाडी सणसर पालखीतळ मुक्काम ( काटेवाडी येथे मेंढी बकऱ्यांचे रिंगण )
२८ जून संसर बेलवाडी, निमगाव केतकी प्रवास मुक्काम
बेलवडी येथे पहिले गोल रिंगण
२९ जून निमगाव केतकी ते इंदापूर प्रवास व मुक्काम
इंदापूर येथे गोल रिंगण
३० जून इंदापूर ते सराटी पालखीतळ प्रवास आणि मुक्काम
१ जून सराटी ते अकलूज प्रवास व मुक्काम
निरास्मान आणि अकलूज येथे गोल रिंगण
२ जून अकलूज ते बोरगाव प्रवास व मुक्काम
माळीनगर येथे उभे रिंगण
३ जून बोरगाव ते पिराची कुरोली प्रवास आणि मुक्काम
४ जून पिराची कुरोली ते वाखरी पालखीतळ मुक्काम
बाजीराव विहीर येथे उभे रिंगण
५ जून वाखरी ते पंढरपूर मुक्काम
वाखरी येथे उभे रिंगण
६ जून एकादशी नगरप्रदक्षिणा आणि चंद्रभागा स्नान
१० जून – पंढरपुरातून देहूकडे परतीच्या प्रवासाला सुरुवात