पुणे शहराच्या उपनगरातील वाघोली परिसरात स्कूल बस व सिमेंट काँक्रिट मिक्चर डंपरचा अपघात झाला. या स्कूल बस मध्ये १० ते १५ मुले होती. या घटनेनंतर अपघाताचे सी सी टीव्ही समोर आले आहे. ही घटना सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास वाघोली लोहगाव रोड वर ग्रीन रिपब्लिक सोसायटी समोर घडली. सर्व मुले सुरक्षित आहेत. कोणीही जखमी झाले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, खराडी येथील कोठारी इंटरनॅशनल स्कूलची बस मुले घेण्यासाठी लोहगाव रोड वरील सोसायटी मध्ये आली होती. मुले घेवून सोसायटी मधून बाहेर पडताना बस अर्ध्या रस्त्यावर आली.यावेळी लोहगाव कडे भरघाव जाणारा सिमेंट काँक्रिट डंपर बस वर आदळुन अपघात झाला. यामध्ये बसच्या पुढील भागाला डंपरची धडक बसली. यावेळी स्थानिक धावत बस जवळ आले. मात्र मुले सुरक्षित असल्याचे त्यांना दिसले. केवळ बसचां पुढील भाग तुटला. या घटनेनंतर नागरिकांनी १०० नंबर वर कॉल करून घटनेची माहिती पोलिसांना दिली.
लोणीकंद वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक गजानन जाधव यांनी घटना स्थळी भेट देवून सोसायटी धारकांशी संवाद साधला.यावेळी बस व डंपर चालक या दोन्ही बेजबाबदार चालकावर कारवाईची मागणी नागरिकांनी गजानन जाधव यांच्याकडे केली. याबाबत अपघातानंतर कोठारी इंटरनॅशनला स्कूलशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संबंधित व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधतील असे सांगण्यात आले. मात्र त्या व्यक्तीने संपर्क साधला नाही.