Latest Marathi News
Ganesh J GIF

स्कूल व्हॅनने सिग्नलवर उभ्या असलेल्या वाहनांना चिरडले

अपघात सीसीटीव्हीत कैद, अपघातात महिला डाॅक्टरचा मृत्यू, फरार चालकाचा शोध सुरू

भोपाळ- देशात रस्ते अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. रस्ते अपघातात अनेकांना आपला जीव गमावावा लागला आहे. आता सध्या भोपाळमध्ये एका बसने रस्त्यावरील मोटारसायकल आणि गाड्यांना धडक दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

भोपाळमधील बाणगंगा चाैकात हा अपघात घडला आहे. सिग्नल लागल्यामुळे रस्त्यावर वाहने उभी होती. तेंव्हा एक स्कुलबस आली आणि तिने वाहनांना धडक दिली. टक्कर होण्यापूर्वी चालक “बाजूला व्हा, बाजूला व्हा” असे ओरडत होता. इशारा देऊनही तो वेळेवर वाहन थांबवू शकला नाही. अपघातानंतर, बस चालकाने गाडी सोडून पळ काढला. रोशनपुरा चौकातून बाणगंगा चौकाकडे येणाऱ्या बसने ब्रेक निकामी झाल्यामुळे नियंत्रण गमावले आणि वाहतूक सिग्नलवर वाट पाहणाऱ्या किमान आठ वाहनांना धडक दिली, असे सांगण्यात येत आहे. अपघातात बीएएमएस डॉक्टर आयेशा खान यांचा मृत्यू झाला आहे. आयेशा जेपी हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप करत होती. व्हिडिओत दिसत आहे की, क्रॉसिंगवर सिग्नलजवळ वाहने उभी असल्याचे दिसून येते. अचानक मागून एक स्कूल बस वेगाने येते आणि तेथे थांबलेल्या वाहनांना धडकते. स्कूटरवर बसलेल्या एका महिला आयेशा बसने थेट धडक दिली. ती बसच्या पुढच्या भागात अडकली आणि सुमारे ५० फूट ओढली गेली. अखेर, तिची स्कूटर बसखालून बाहेर फेकली गेली, पण ती पुढच्या चाकाखाली आली आणि तिचा जीव गेला आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.

पोलिसांनी चालकाचा शोध सुरू केला आहे आणि वाहनात यांत्रिक बिघाड आहे का याची तपासणी केली जात आहे, असे टीआय अराजरिया यांनी सांगितले. पण कोणतीही चूक नसताना एका महिला डाॅक्टला मात्र आपला जीव गमावावा लागला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!