Just another WordPress site

धाडस पडल महागात…स्काॅर्पिओ गेली वाहून.. सहा जणांचा मृत्यू, बघा नेमक काय घडल…?

नागपूर प्रतिनिधी : राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत. तर काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. नागपुरातही मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसात पूर आलेल्या नदीवरुन स्कॉर्पिओ नेण्याचा प्रयत्न एका चालकाने केला आणि पुराच्या पाण्यात ती स्कॉर्पिओ वाहून गेली. स्कॉर्पिओ वाहून गेल्याचा व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नागपुरातील बामनमारी नदीला पूर आला आहे. या नदीच्या पुलावरुन एका चालकाने स्कॉर्पिओ नेली आणि पाण्याच्या प्रवाहात ती गाडी वाहून केली. या गाडीत एकूण सहा ते आठ प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. गाडी वाहून जाताच गाडीतील प्रवाशांनी मदतीसाठी आक्रोश सुरू केला. काही अंतरावर जाऊन ही गाडी नदीच्या मधोमध पाण्यात अडकली. व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसत आहे की, नदीच्या पाण्यात स्कॉर्पिओ अडकली आहे. तसेच गाडीत असलेल्या प्रवाशांचे हातही खिडकीतून बाहेर दिसून येत आहेत. गाडी वाहून गेल्याची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थ, पोलीस आणि इतर प्रशासकीय अधिकारी दाखल झाले. त्यांनी मदत आणि बचावकार्य सुरू केले आहे. या गाडीतील काही प्रवासी वाहून गेल्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.

बघा व्हिडिओ – 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!