Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यात कलम १४४ लागू… काय आहे कारण ? बघा सविस्तर बातमी

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अशातच पुणे पोलिसांनी शहरातील काही भागात कलम 144 लागू केला आहे.पुण्यात पुण्येश्वर मंदिर आणि छोटा शेख सल्ला दर्ग्यावरून काही दिवसांपूर्वी वाद निर्माण झाला होता. त्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशा परिस्थितीत आणखी वाद पेटू नये. खबरदारी म्हणून पोलिस आयुक्तांनी कसबा पेठेतील काही भागात कलम 144 लागू करण्यात आला आहे.तसेच जातीय तेढ निर्माण करणाऱ्या व कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या कारवायांवर आळा घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.जमावबंदी घोषित करण्यात आली असून पवळे चौक ते कुंभार वेस चौकात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिसरातील नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील पुणे पोलिसांनी दिला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कलम 144 लागू करण्यात आलेल्या परिसरात अफवा पसरवणे, सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर पसरवणे, पूर्वपरवानगीशिवाय सार्वजनिक मेळावे तसेत कार्यक्रमांच्या आयोजनास बंद घालण्यात आली आहे. येत्या 10 एप्रिल 2024 पर्यंत हे निर्बंध लावण्यात आले आहेत. निर्बंधांचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहितेच्या कलम 188 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

पुण्यात कुठे कुठे कलम 144 लागू होणार ?

पुण्यातील पवळे चौक ते कुंभार वेस चौक, भोई गल्ली, कागडीपुरा, कुंभारवाडा, आलोकनगर सोसायटी आणि अग्रवाल तालीम भागात कलम 144 लागू करण्यात आला आहे.

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!