Latest Marathi News
Ganesh J GIF

अमोल कोल्हे शिवाजीराव आढळरावांच्या परत पडले पाया, हे पाहून आढळरावांनी ही कोल्हेंचे धरले पाय …

राज्यातील विविध लोकसभा मतदारसंघांमध्ये सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही पक्ष समोरासमोर आल्याचे पाहायला मिळाले आहे. शिरूरचे खासदार अमोल कोल्हे हे मा. खासदार शिवाजीराव आढळराव यांना शिवनेरी किल्यावर भेटल्यावर त्यांनी त्यांचे दर्शन घेतल्याचा व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पहिला असेल, असाच एक व्हिडीओ आता परत व्हायरल होत आहे.अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील हे दोन्ही नेते एकत्र आल्यावर परत एकदा महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन दिसून आले आहे. यावेळी अमोल कोल्हे हे शिवाजीराव आढळराव यांच्या पाया पडल्यावर त्यांनीही परत कोल्हे यांच्या पायाला हात लावल्याचे दिसून आले आहे. दोंघांनीही एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवताना संस्कृतीचे दर्शन घडवल्याचे दिसून येत आहे. यामुळे मतदारसंघातील जनतेमध्ये चांगला संदेश गेला आहे.

अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव हे दोघे खेड येथील हरिनाम सप्ताहमध्ये एकत्र आले होते. आज नरेंद्र मोदी यांची पुण्यामध्ये सभा असून या सभेसाठी शिवाजीराव आढळराव पाटील हे उपस्थित राहणार होते. पण या ठिकाणी ते दोघे उपस्थित राहिल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. या वेळी दोघांनी एकमकेकांचे पाय धरल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत.अमोल कोल्हे यांनी यावेळी शिवाजीराव आढळराव यांच्यापुढे दमदार भाषण केल्याचे दिसून आले. अमोल कोल्हे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. कोल्हे यांनी यावेळी नरेंद्र मोदी यांच्या मागील लोकसभा निवडणुकीवेळी दिलेल्या भाषणाच्या काही पंक्ती म्हणून दाखवल्या. त्यामुळे कोल्हे यांच्या भाषणाची चर्चा सगळीकडे सुरु होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!