सिरम कंपनीने शिवेचा रस्ता बंद केल्याने साडेसतरा नळी ग्रामस्थांचे आंदोलन – आदर पूनावाला यांच्या समवेत साडेसतरानळी आंदोलकांची बैठक.. अखेर रस्ता खुला”
पुणे (प्रतिनिधी) – पूर्व कल्पना न देता सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनीने साडेसतरानळी मांजरी शिवेचा ब्रिटिशकालीन रस्ता बंद केल्याने ग्रामस्थांनी संतप्त होऊन ठिय्या आंदोलन केले.
अचानक पत्रे मारून पाया खोदून रस्ता बंद केल्याने नागरिक व पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली अन रस्ता खुला करण्यात आला.
आमदार चेतन तुपे, माजी उपसभापती संदीप तुपे, माजी उपसरपंच रुपेश तुपे, भूषण तुपे, माजी उपसरपंच नितीन तुपे, महेश तुपे, संतोष तुपे, प्रदीप गोगावले, दिपक देवकर, सुभाष अडसूळ, बाळासाहेब तोडमल, सनी तोडमल, कृष्णा भोसले यांच्यासह महिला वा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले तसेच सिरम कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करून त्यानंतर निर्णय घेण्यात येईल असे आवाहन केले मात्र जोपर्यंत रस्ता खुला होत नाही तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही असा पवित्र नागरिकांनी घेतल्याने कंपनीच्या व्यवस्थापनाने रस्ता खुला केला.
यावेळी मोठा पोलीस फौजफाटा होता, काही काळ वातावरण संतप्त झाले होते. मात्र सामंजस्याने अडथळे दूर करून रस्ता खुला झाल्याने पुढील दुर्घटना टळली.
सिरम कंपनीने अचानक न सांगता आज सेवेचा रस्ता बंद केल्याने साडे सतरा नळी भागातील ग्रामस्थ संतप्त झाले होते यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता नागरिकांच्या संतप्त भावना पाहून कंपनीने हातबल होऊन रस्ता खुला केला. आदर पुन्हा वाला यांच्या सोबत बैठक झाली आहे या विषयावर चर्चा झाल्याचे आमदार चेतन तुपे यांनी सांगितले.
या संदर्भात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
सिरमचे व्यवस्थापकीय संचालक आदर पुनावाला यांच्या समवेत झालेल्या बैठकीत उपसभापती संदीप नाना तुपे व माजी उपसरपंच रुपेश तुपे यांनी हा रस्ता सेवेचा रस्ता असून अनेक वर्षापासून खुला आहे गावातील नागरिकांची अडचण होऊ नये यासाठी हा रस्ता बंद करू नये अशी आग्रही भूमिका घेतली.