पुण्यात अमित शहांनी भाजपच्या अधिवेशनात विरोधकांवर सडकून टीका केली आहे. राहुल गांधी अहंकारी बनल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. तर शरद पवार भ्रष्टाचारी आसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.उद्धव ठाकरेंवरही शहांनी सडकून टिका केली आहे. कसाबला बिर्याणी खाऊ घालणाऱ्यासोबत उद्धव ठाकरे बसतात असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला आहे.शहा म्हणाले, देशसुरक्षेसाठी आम्ही प्राधान्य दिले आहे. येत्या दोन वर्षात देश नक्षलवादापासून मुक्त होईल. आतंकवाद मुळापासून काढला आहे. देशाच्या सुरक्षेला औरंगाबाद फॅन क्लब करू शकत नाही. आघाडीवाले फॅन क्लब आहे. त्यांचे नेता उद्धव ठाकरे आहेत. कसाबला बिर्याणी खाऊ घालणाऱ्यासोबत ते बसत आहेत. संभाजीनगरला विरोध करताता त्या़च्याजवळ ते बसतात. लाज वाटली पाहिजे. हे सुरक्षित करू शकत नाहीत.
देशाला पुन्हा दाखवून द्या आणि महाराष्ट्रात भाजपला विजयी करा. इतिहासातील सर्वात मोठा विजय येथे होईल. महाराष्ट्रात शरद पवारांना विचारतो की, केंद्रात, राज्यात दहा वर्षे तुमचे सरकार होते. तुम्ही खोटे आश्वासन दिले. बाकी काहीच दिले नाही. दहा वर्षात १० हजार ५ कोटी रूपये महाराष्ट्राला दिले आहेत. त्यांनी काहीच केले नाही. रस्ते ७५ कोटी, रेल्वे २ लाख कोटी दिले. १ लाख कोटी मुंबई बुलेट ट्रेन केले. ११ हजार कोटींचा पालखी मार्ग केला. पवारांनी कसला विकास केला. पवारांनी दहा वर्षे कृषी मंत्री होते. मी दीड मिनिटांत साखर कारखान्यांचे काम केले. लाडकी बहिण योजना आली. पवार साहेब म्हणातात नवीन काय. पण तुम्ही का नाही केले. पुन्हा भाजपची सरकार येईल.
लोकसभेच्या पराभवानंतर शहांनी कार्यकर्त्यांना भाषणातून पाठबळ दिले आहे. ते म्हणाले, कार्यकर्त्यांना नाराज होऊ नका. आपला विजय निश्चित आहे. महाराष्ट्रात आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय होणार आहे आणि युतीचे सरकार येईल. माझ्या शब्दांना लक्षात ठेवा. त्यासाठी आज आपण संकल्प करूया. आपण विचारधारेला घेऊन राजकारणात आलो. आपला पक्ष विचारधारेवर स्थापन झाला आहे. एका देशात दोन नियम नाही चालणार. म्हणून मोदी सरकारने २७० कलम काढून टाकले. रामजन्मभूमीवर कोणाला वाटले नव्हते की तिथे रामप्रभू विराजमान होतील. पण हे सर्व मोदी सरकारने करून दाखवले.