
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (अजित पवार गट) खासदार प्रफुल पटेल यांनी वाराणसी येथून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देताना जिरेटोप घातली.छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेशी घट्ट बांधल्या गेलेली जिरेटोप मोदींना घातल्याप्रकरणी शिवभक्तांमधून पटेल यांच्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले होते. तसेच विरोधकांनी देखील या पटेल यांच्यावर सडकून टीका केली.अशात यावर आता शरद पवार यांनीही लाचारीला देखील मर्यादा असते अस म्हणत पटेल यांचा खरपूस समाचार घेतला आहे. शरद पवार म्हणाले,’मोदींचा जिरेटोप घालून सत्कार केल्याने वादाला तोंड फुटले आहे. महराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अपमान असल्याचे सांगत विरोधकांनी प्रफुल पटेल यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. पंतप्रधानांनी मोदींना जिरेटोप भेट देण्यावरून शरद पवारांनी टीका केली. लाचारीला देखील मर्यादा असते अशा शब्दांत पवारांनी पटेल यांचा समाचार घेतला आहे.
शरद पवार पुढे म्हणाले, ‘जिरेटोप आणि महाराष्ट्राचा इतिहास आहे. तो जिरेटोप छत्रपती शिवाजी महाराजांसाठी ओळखला जातो. – लाचारी असते नाही असं नाही पण लाचारीला काही मर्यादा असते, त्या सगळ्या मर्यादा त्या लोकांनी सोडल्या आहेत. एक चांगले झालं की त्यांनी सांगितले की पुन्हा आम्ही काळजी घेऊ .’ असेही ते म्हणाले आहे.या वादाला प्रफुल्ल पटेल यांनी आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणाले,’हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या आदर्शांवर व लोककल्याणाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होईल, अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही. यापुढे काळजी घेऊ.’ असं प्रफुल पटेल यांनी म्हटले आहे