Latest Marathi News
Ganesh J GIF

शरद पवार यांच्याकडून राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त, पाहा नेमकं काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील भीषण दुष्काळाच्या परिस्थितीबाबत माहिती दिली. ‘राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे.४० तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. राज्यात सध्या ७३ टक्के दुष्काळ आहे. १५०० महसूल मंडळात दुष्काळ आहे. संभाजी नगर आणि पुण्यात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. संभाजी नगरमध्ये १० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पुण्यात १६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नाशिकमध्ये २२ टक्के पाणीसाठा शिक्कल आहे. कोकणात २९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मोठ्या धरणात सध्या पाणीसाठा हा कमी आहे. उजनीमध्ये उपयुक्त जलसाठा शून्य आहे. जायकवाडीत ५ टक्के पाणीसाठा हा शिल्लक आहे. मांजरा धरणात सध्या शून्य टक्के पाणीसाठा आहे. पाऊस पडेल पण धरणात पाणीसाठा हा जमा होण्यास आपल्याला जुलैची वाट बघावी लागणार आहे”, असं शरद पवार सांगत शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली.

“संभाजीनगरमध्ये १५६१ गावात दुष्काळ आहे. तिथे १०३८ पाण्याचे टँकर चालत आहेत. पुणे विभागात सध्या ६३५ गावात टँकरने पाणीपुरवठा केलं जात आहे. १०५७२ गावात सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या वर्षी ११०८ गावात टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. जनावरांच्या चाऱ्याची मागणी सध्या आहे. पण जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा हा आत्ता उरला आहे”, असं शरद पवार म्हणाले.“कर्जवसुलीला स्थगितीची मागणी सध्या आहे. वीजबिलात सूट देण्यात यावी आणि वीजपुरवठा खंडित करण्यात येऊ नये. मनरेगाच्या नियमात शिथिलता आणावी. फळबागांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा. शालेय विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफ करावं. हे संकट राज्यावर आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून यात काम करावं. राज्य सरकारने आचारसंहितेत शिथिलता आणण्यासाठी मागणी केली आहे. ती योग्य मागणी आहे. कृषीमंत्र्यांचा जिल्हा हा दुष्काळाच्या बाबतीत अधिक गंभीर आहे. पण ते नव्हते ही माहिती तुमच्याकडून मला कळत आहे. पण आम्ही आत्ता पत्रकार परिषद घेऊन आम्ही सरकारला जागी करत आहोत. पण ते जागे झाले नाहीत तर आमच्याकडे इतर मार्ग आहेत”, असा इशारा शरद पवार यांनी दिला.

मनुस्मृती पाठ्यपुस्तकात सहभागी करुन घेतील की काय? अशी चर्चा सध्या सुरु आहे. याबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारलं असता त्यांनी राज्य सरकारला टोला लगावला. “यावरून राज्य सरकारची मानसिकता कळतेय. याबाबत शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांनी लक्ष घालावं. जर नाही घेतलं तर अनेक अशा संस्था आहे ज्या गप्प बसणार नाहीत. शालेय पुस्तकाचे रिरायट करण्याची बातमी चिंताजनक आहे”, असं म्हणत शरद पवारांनी चिंता व्यक्त केली.शरद पवार यांना यावेळी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवार यांनी फार प्रतिक्रिया देणं टाळलं. “पुण्याचे पालकमंत्री कुठे आहेत? असा सवाल तुम्ही मला करत आहात ना? तो प्रश्न त्यांना विचारा”, असं शरद पवार म्हणाले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!