‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच मला विशेष आभार मानावं लागतील, त्यांच्या जिथ जिथ सभा झाल्या त्याचा आम्हाला मोठा फायदा झाला, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींना लगावला.लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी मोठं यश मिळालं आहे. आता महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी शनिवारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना (उबाठा) या तिन्ही पक्षांची प्राथमिक बैठक झाली. या बैठकीत लोकसभेपेक्षा अधिक ताकदीने विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांची माहिती महविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेतून दिली. पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे, शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते.
यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधा नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. पवार म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच मला विशेष आभार मानावं लागतील. त्यांच्या जिथ जिथ सभा झाल्या, त्याचा आम्हाला मोठा फायदा झाला. त्यांच्या जास्तीत जास्त सभा येत्या विधानसभेला व्हाव्यात म्हणजे मोदींमुळे आम्ही स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करत राहू, असा खोचक टोला पवारांनी लगावला. हा विजय अंतिम नाही तर ही लढाई आत्ता सुरू झाली आहे. हे सरकार किती दिवस चालेल हे दिसेलच. हे एनडीएचं सरकार आहे. देशातील जनता जागी झाली आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानण्यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केली आहे. लोकशाही वाचवण्याचे काम महाराष्ट्रातील जनतेने केले आहे. कारण महाविकास आघाडीच्या या विजयात जनतेचा सिंहाचा वाटा आहे. जनतेने आघाडीला निर्णायक बहुमत दिले आहे. सर्व घटकातून पाठिंबा दिला गेला आहे. या निवडणुकीत आम्ही तीन पक्ष आहोत. तसेच यामध्ये 30 ते 40 च्यावर जनसंघटना होत्या. छोटे पक्षही होते. या सर्वांनी मेहनत घेतली. जनजागरण केले. पक्ष आणि संघटनांची यादी आहे. काही सामाजिक कार्यकर्तेही होते. त्यांनीही महाराष्ट्रातील वातावरण निर्माण केलं. राज्यातील जनतेने देशातील लोकशाही वाचवण्यात मोठी भूमिका निभावली. सिंहाचा वाटा आहे, असे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.