कर्नाटकाच्या निवडणूकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची एंट्री
निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस 'इतक्या' जागा लढवणार, उमेदवारांचीही घोषणा
मुंबई दि २१(प्रतिनिधी)- कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे घड्याळ हे चिन्ह भेटल्यामुळे राष्ट्रवादीचा उत्साह वाढला आहे. पक्षाने आज उमेदवारांची घोषणा केली आहे.
राष्ट्रवादी कर्नाटकात ९ जागा लढवणार आहे. उमेदवारांची नावे देखील जाहीर करण्यात आली आहेत. कर्नाटकातील सात जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी आपली ताकत आजमावणार आहे. राष्ट्रवादीने उमेदवारांची घोषणा केली आहे.उत्तम पाटील, मन्सूर बिलागी, जमीर इनामदार, कुलप्पा चव्हाण, हरी आर , आर शंकर माजी मंत्री, सुगुणा के., एस.वाय.एम.मसूद फौजदार, रेहाना बानो अशी उमेदवारांच्या नावांची यादी समोर आली आहे. राष्ट्रवादी कोडोगो (१ जागा), मैसूर (१), बेळगाव (१), बीजापूर (३ जागा), कोप्पल (१), हवेरी (१), विजयनरगर (१) या जागा लढणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटक विधानसभा निवडणूक घड्याळ या चिन्हावर लढणार आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढण्यात आला. यामुळे कर्नाटक विधानसभा निवडणूक लढवण्याचा दावा करणारा राष्ट्रवादी पक्ष कोणत्या चिन्हावर लढणार याबाबत तर्क वितर्क केले जात होते. पण पक्षाने निवडणूक आयोगाला विनंती केली. त्यानंतर निवडणूक आयोगाने ही विनंती मान्य केली. कर्नाटक विधानसभा निवडणूक १० मे रोजी होणार असून १३ मे रोजी मतमोजणी केली जाणार आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात भाजप आणि काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष आहेत. मात्र आता राष्ट्रवादीने देखील कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे.