Latest Marathi News
Ganesh J GIF

शिंदे गटाच्या आमदाराची कॅन्टिन चालकाला बेदम मारहाण

शिळे जेवण दिल्याचा दावा करत बनियनवर येत दिला चोप, व्हिडिओ व्हायरल, विधानसभेत मुद्दा गाजणार, कारवाईची मागणी

मुंबई – शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि वाद हे समीकरणच बनले आहे. हे संजय गायकवाड पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहेत. संजय गायकवाड यांनी शिळे व निकृष्ट जेवण दिल्याच्या कारणावरून कॅन्टिन कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे. त्यांचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पावसाळी अधिवेशन सुरु असल्यामुळे आमदार मुंबईत आहेत. आमदार गायकवाड आकाशवाणी आमदार वसतिगृहात थांबलेले आहेत. रात्री आमदार संजय गायकवाड यांनी जेवण मागवले होते, त्यांना ऑर्डर प्रमाणे रूममध्ये जेवणही पुरवण्यात आलं. पण खराब डाळ आणि भात देण्यात त्यांना देण्यात आला. डाळीला अतिशय घाण वास येत होता, डाळाची दुर्गंधी पाहून संजय गायकवाड यांचा पारा चढला आणि त्यांनी कॅन्टीन ऑपरेटरला याबाबत विचारणा केली. पण उत्तर न आल्याने संतापलेल्या गायकवाड यांनी बील काऊंंटरवरती बसलेल्या ऑपरेटरच्या कानाखाली लगावली. गायकवाड म्हणाले की, फक्त आमदारच नाहीतर अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी इथे जेवणासाठी येत असतात. कोणाच्या जेवणात सुतळी, पाल मिळते. मग्रुरीच काम चालू आहे. १० दिवसापूर्वीचा शिळा भात आणि वरण दिलं. अशावेळी या लोकांची पूजा करायची का?” असा सवाल संजय गायकवाड यांनी विचारला. “जे वरण दिलं, ते चार-पाच दिवसापूर्वीच आहे. तुम्ही वास घेऊन पाहू शकता. वारंवार सांगून हे ऐकत नसतील, मराठी-हिंदी समजत नसेल, तर आम्हाला आमच्या स्टाइलमध्ये उत्तर द्यावं लागेल. असं म्हणतं संजय गायकवाड यांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान यापूर्वीही मी कॅन्टीनमधील जेवणाची दोन ते तीन वेळा तक्रार केली असल्याचे संजय गायकवाड यांनी सांगितले. तसेच आज सभागृहात हा मुद्दाम उचलणार असल्याची माहितीही संजय गायकवाड यांनी दिली आहे.

 

आमदार गायकवाड यांनी कर्मचाऱ्यावर हात उचलल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या घडलेल्या प्रकरणाची माहिती आकाशवाणी आमदार निवास प्रशासनाला देण्यात आली असून पुढील तपास करण्यात येत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!