शिंदे फडणवीस सरकारचा महाविकास आघाडीला जोरदार दणका
'या' महत्वाच्या नेत्यांची सुरक्षा काढली, पण 'या' नेत्यांवर मेहेरबानी चर्चेत
मुंबई दि २८(प्रतिनिधी)- शिंदे फडणवीस सरकारने पुन्हा एकदा महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. शिंदे फडणवीस सरकारने महाविकास आघाडीच्या महत्वाच्या नेत्यांची सुरक्षा काढली आहे. मात्र मिलिंद नार्वेकर यांची सुरक्षा मात्र वाढवण्यात आली आहे. तर जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षाही जैसे थे ठेवण्यात आली आहे. आता नेत्यांच्या सुरक्षेवरुन राजकारण होण्याची शक्यता आहे.
शिंदे फडणवीस सरकारने सत्तेत आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या अनेक निर्णायांना स्थगिती देण्यात आली होती. त्यावरुन बराच वाद निर्माण झाला होता तर राज्यात येऊ घातलेले प्रकल्प राज्याबाहेर जात असल्याने त्या मुद्यावरही बरेच राजकारण होत आहे. आता महत्वाच्या नेत्यांची सुरक्षा काढत शिंदे सरकारने विरोधकांना धक्का दिला आहे. मात्र ही सुरक्षा कपात करत असताना राज्य सरकारला अनुकूल भुमिका घेणारे जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा कायम असणार आहे तर शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने प्रसिद्धीच्या झोतात असलेले मिलिंद नार्वेकर यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तर बंडखोर आमदारांना दिलेली सुरक्षा अद्यापही कायम आहे.
या नेत्यांची सुरक्षा काढली
वरुण सरदेसाई
छगन भुजबळ
बाळासाहेब थोरात
नितीन राऊत
नाना पटोले
जयंत पाटील
सतेज पाटील
संजय राऊत
विजय वडेट्टीवार
धनंजय मुंडे
भास्कर जाधव
नवाब मलिक
नगरहरी झिरवळे
सुनील केदारे
डेलकर परिवार