Just another WordPress site

मराठी अभिनेत्रीचा ‘या’ चित्रपटातील किसिंग सीन व्हायरल

अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज पाहून चाहतेही अवाक, हे गाणे एकदा बघाच

मुंबई दि २८(प्रतिनिधी) आपल्या चुलबुल्या अंदाजात प्रेक्षकांना खळखळून हसवणारी महाराष्ट्राची हास्यजत्रामुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवाली परब लवकरच एका चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.पण या चित्रपटामुळे ती वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे.


शिवाली ‘प्रेम प्रथा धुमशान’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना शिवालीचा चक्क बोल्ड अंदाज पाहायला मिळणार आहे. शिवाली पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहे. या चित्रपटातील ‘काय उमगेना’ हे गाणे नुकतंच प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात शिवालीने थेट लिपलॉकिंग सीन दिले आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ४ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गावातील प्रेमकथेवर हा चित्रपट आधारित असणार आहे. पण शिवालीच्या बोल्ड अंदाजामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सध्या काय उमगेमा गाण्याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

GIF Advt

अभिजीत वारंग दिग्दर्शित ‘प्रेम प्रथा धुमशान’ चित्रपटात शिवालीसह विनायक चव्हाण, अभय खडपकर, अभय नेवगी, मिलिंद गुरव, विश्वजित पालव, विद्याधर कार्लेकर, निकिता सावंत, कल्पना बांदेकर झळकणार आहेत. तर या चित्रपटाची निर्मिती ऑक्सिजन फिल्म्स, डायनॅमिक पिक्चर्स, आरव्हीके फिल्म्स यांनी केली आहे. शिवालीचा नवा अंदाज पाहण्यासाठी अनेकजण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!