शिंदे गटाला केंद्रात मिळणार ‘ही’ तीन मंत्रीपदे
मंत्रिपदासाठी शिंदे गटाच्या या खासदारांची चर्चा, राहुल शेवाळेंचा पत्ता कट
मुंबई दि १९(प्रतिनिधी)- केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दोन कॅबिनेट मंत्रिपदाएवजी तीन राज्यमंत्रीपदे देण्यात येणार आहेत. या तीन राज्यमंत्री पदासाठी गजानन किर्तीकर, श्रीरंग बारणे आणि कृपाल तुमाने, प्रताप जाधव यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. पण संधी कोणाला मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत विधानसभेप्रमाणे लोकसभेतील तेरा खासदारांचा पाठिंबा आहे. शिंदे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात दोन कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मागितले होते. पण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने शिंदे गटाला तीन राज्यमंत्रीपदे देणार असल्याची चर्चा आहे. राज्यातील सत्तासंघर्षानंतर एकनाथ शिंदेंच्या रुपाने भाजपला भक्कम साथीदार मिळाला आहे. तेव्हा भाजपने शिंदे गटाला तीन मंत्रिपदे देण्याचे ठरवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून गजानन कीर्तिकर, श्रीरंग बारणे, कृपाल तुमाने, प्रताप जाधव यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मंत्रीपद दिले जाणार आहे.
लोकसभेतील शिंदे गटाचे गटनेते राहुल शेवाळे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.शिंदे यांच्या बंडात राहुल शेवाळे यांची महत्वाची भूमिका असली तरी त्यांच्यावर एका महिलेने आरोप केले आहेत. त्यांना मंत्रीपद देणे अडचणीचे ठरण्याची शक्यता असल्याने त्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.