Latest Marathi News
Ganesh J GIF

अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार शिंदे गटाच्या वाटेवर?

राज्यात राजकीय भूकंप होणार, पार्थ पवार विधानसभा लढवणार?

मुंबई दि १९(प्रतिनिधी)- विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पार्थ पवार यांनी शिंदे गटाचे नेते आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पार्थ पवार यांनी शंभूराज देसाई यांचा शासकीय बंगला असलेल्या पावनगडवर जाऊन देसाई यांची भेट घेतली. यावेळी पार्थ पवार आणि शंभूराज देसाई यांच्यामध्ये पंधरा ते वीस मिनिट चर्चा झाली. पार्थ पवार यांनी शंभूराज देसाई यांची भेट का घेतली? तसेच या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहेत. मात्र या भेटीमुळे राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण आलं आहे. भाजपा आणि शिंदे गटाचे नेते यंदा बारामती जिंकून दाखवू असे वारंवार सांगत आहेत त्यातच पार्थ पवार यांनी देसाईंची भेट घेतल्याने अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. पार्थ पवार शिंदे गटाच्या नेत्याची भेट घेत असल्याने पडद्यामागे नेमकं काय घडत आहे याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. पार्थ पवार हे काहीसे बंडखोर स्वभावाचे आहेत त्यामुळे या भेटीला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.

पार्थ पवार अस्वस्थ आहेत. त्यामुळे त्यांनी शंभूराजे देसाई यांची भेट घेतली असावी. रोहित पवार आमदार झाले. बारामती अॅग्रोही त्यांच्याकडे आहे. मुंबई क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षही रोहित पवार झाले. आजोबांकडून अन्याय होत असल्याची भावना पार्थची असेल अशी खोचक प्रतिक्रिया गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे. आता पार्थ पवार कोणती भुमिका घेणार हे पहावे लागणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!