महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळालंय. महायुतीने महाविकास आघाडीला पराभव करत २३६ जागा मिळवल्या आहेत.दरम्यान महायुतीने मोठा विजय मिळवला असला तरी अद्याप मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय झालेला नाही. मात्र, आज एकनाथ शिंदे यांनी भाजपचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, ते मान्य असल्याचे म्हटले आहे.त्यामुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असे बोलले जात आहे.
दरम्यान, महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात शिवसेना शिंदे गटाचे आमदार आशिष जैस्वाल यांना देखील संधी मिळण्याची शक्यता आहे. संभाव्य मंत्र्यांमध्ये त्यांचे नाव आघाडीवर आहे. रामटेक विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.भरत गोगावले यांची देखील मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. ते महाड विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.गुलाबराव पाटील यांना देखील मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. ते जळगाव ग्रामीण मधून निवडून आले आहेत.निलेश राणे यांचे देखील संभाव्य मंत्रीपदाच्या यादीत नाव असल्याची माहिती मिळत आहे. ते कुडाळ मतदारसंघातून निवडून आले आहेत.राजेश क्षीरसागर यांची देखील मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता ते आहे. ते कोल्हापूर उत्तरमधून निवडून आले आहेत.
प्रताप सरनाईक यांची देखील मंत्रीमंळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. ते ओवळा-माजिवडा मतदारसंघातून निवडून आले आहेत.शंभूराज देसाई यांनी देखील चांगल खाते मिळण्याची शक्यता आहे. ते पाटण विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते.संजय शिरसाट यांचे देखील संभाव्य मंत्री म्हणून बघितलं जात आहे. ते औरंगाबाद पश्चिम विधानसबा मतदारसंघातून निवडून आले आहेत.तानाजी सावंत यांची देखील मंत्रीमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. ते परांडा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.उदय सामंत यांना देखील चांगल खातं मिळण्याची शक्यता आहे. ते रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.प्रकाश सुर्वे देखील मंत्री होण्याची शक्यता आहे. ते हे मागाठणे मतदारसंघातून निवडून आले आहेत.