‘या’अभिनेत्रीमुळे शोएब मलिक सानिया मिर्झाच्या नात्यात दुरावा
मलिकचे अभिनेत्रीसोबत बोल्ड फोटो व्हायरल, सानिया घेणार घटस्फोट?
मुंबई दि १२(प्रतिनिधी)- भारताची स्टार टेनिस खेळाडू सानिया मिर्जा आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी आल्याचे दिसत आहे. लवकरच या दोघांचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा आहे. या जोडप्याच्या दुराव्याचे कारण समोर आले आहे.एका पाकिस्तानी अभिनेत्रीमुळे दो्घे वेगळे होत असल्याची चर्चा आहे.
सानिया मिर्झा आणि शोएब मलिक मागच्या १२ वर्षांपासून एकत्र आहेत. १२ एप्रिल २०१० रोजी त्यांचे लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा देखील आहे. मागच्या मोठ्या काळापासून हे आनंदात संसार करत आहे. पण आता त्यांच्या नात्यात दुरावा आला आहे. माध्यमांमध्ये दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. पाकिस्ताची एक मॉडेल आणि अभिनेत्री आयशा उमर सानिया आणि शोएब यांच्यातील नाते तुटण्यास कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे.शोएब मलिक आणि आयशा उमरने मागच्या वर्षी एका पाकिस्तानी मॅगझीनसाठी फोटोशूट केले होते. त्यानंतर या दोघांची मैत्री वाढत गेली. अलिकडे त्यांचे संबंध अधिकच जवळचे बनले आहेत. याच कारणास्तव सानिया मिर्झा नाराज असल्याचे सांगितले जात आहे.सध्या सोशल मीडियावर आयशा आणि शोएबचे मागच्या वर्षीचे फोटो व्हायरल होत आहे.
सानिया आणि शोएबच्या एखा जवळच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या घटस्फोटाची सर्व तयारी झाली आहे आणि लवकच अधिकृत कारवाई केली जाणार आहे. सानिया आणि शोएबमधील दुराव्याच्या बातम्या समोर येताच हे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. पण दोघांनी अधिकृतपणे यावर कोणतेही भाष्य केलेले नाही.