
मेव्हणीसोबत लग्न करण्यास नकार मिळाल्याने जावयाचे धक्कादायक कृत्य
तीन मुलांचा बाप पण तरीही मेव्हणीवर जीव जडला, सासू, मेव्हणी आणि मेव्हण्यासोबत नको ते घडलं, संदिपचे धक्कादायक कृत्य
सुरत – सुरतमध्ये दाजीने आपल्या मेव्हणीसोबत लग्नाची लग्नाची इच्छा व्यक्त केली होती. लग्नाला विरोध मिळताच त्याने मेहुणा, मेहुणी आणि सासूवर निर्घृण हल्ला केला. या हल्ल्यात मेहुणा आणि मेहुणीचा मृत्यू झाला, तर सासू गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
संदीप घनश्याम गौर असे हत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. सुरत शहरातील उधना पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पटेल नगर परिसरातील साई जलाराम सोसायटीत ही घटना घडली आहे. पत्नी आणि तीन मुलांसह संदीप घनश्याम गौर याने ही रक्तरंजित दुहेरी हत्या केली आहे. बुधवारी रात्री उशिरा, साई जलाराम सोसायटीच्या घरात सर्वजण उपस्थित असताना, त्याच घरात राहणारा संदीपने मेव्हणीशी लग्न करण्याची इच्छा मेहुणा आणि सासूकडे व्यक्त केली. संदीपची इच्छा ऐकून घरातील सर्वांना धक्का बसला. यामुळे कुटुंबात वादविवाद सुरू झाला आणि त्यातून भांडण सुरू झाले. त्यानंतर संदीप गौरने त्याचा मेहुणा निश्चय कश्यप, मेहुणी ममता कश्यप आणि सासू शकुंतला देवी यांच्यावर चाकूने सपासप वार करण्यास सुरुवात केली. त्याचा मेहुणा आणि मेहुणी जागीच मरण पावले. त्याच्या सासूला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले आणि तिच्यावर उपचार सुरू आहेत. दुहेरी हत्याकांडाची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृत भावंडांचे मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. सुरत पोलिस उपायुक्त डॉ. कानन देसाई यांनी सांगितले की, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. संदीप गौरचा त्याच्या मेहुणीशी लग्न करण्यावरून वाद झाला होता, ज्यामध्ये त्याने त्याचा मेहुणा आणि मेहुणीची हत्या केली, तर सासूला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
संदीपचा मेहुणा निश्चय अशोक कश्यप, त्याची बहीण ममता कश्यप आणि आई शकुंतला देवी यांच्यासह ४ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रयागराजहून सुरतला त्याच्या भावाच्या लग्नासाठी कपडे खरेदी करण्यासाठी आला होता. पण तोच प्रसंग त्यांच्यासाठी काळ बनला.