Latest Marathi News
Ganesh J GIF

धक्कादायक! पती पत्नीने एकाच वेळी घेतला जगाचा निरोप

पत्नीने घेतले विष तर पतीने घेतला गळफास, पोलीसांच्या तपासात हे कारण समोर, परिसरात एकच खळबळ

नाशिक दि २५(प्रतिनिधी)- नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कारण पती आणि पत्नीने आत्महत्या केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पत्नीने विष घेऊन तर पतीने घळफास घेऊन आत्महत्या केली. चांदवडच्या परसूल येथे ही घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

भाऊसाहेब बरकले असे पतीचे तर सुनीता बरकले असे आत्महत्या केलेल्या पत्नीचे नाव आहे. या दाम्पत्याला एक मुलगी आहे. भाऊसाहेब बरकले यांची आई तसेच त्यांची मुलगी या दोन्ही एका वेगळ्या खोलीत होत्या. तर हे पती पत्नी एका वेगळ्या खोलीत होते. सकाळी त्यांनी दार न उघडल्याने ही घटना समोर आली. यानंतर या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहे. तर घरगुती वादातून या दाम्पत्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र अद्याप ठोस असे कारण समोर आलेले नाही.

राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या तसेच खुनाच्याही घटना घडत आहेत. यामुळे पोलीसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!