
धक्कादायक! पतीने या कारणासाठी केली दोन पत्नीची हत्या
पोलिसांसमोर पतीची धक्कादायक कबुली, पोलीस पत्नीलाही संपवले, अपर्णा आणि शुभासोबत दिपकने काय केले?
भुवनेश्वर – ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमधून बेपत्ता झालेल्या महिला हवालदाराच्या मृ्त्यूचं गूढ उकललं आहे. महिलेची हत्या तिच्याच पतीनं केली. त्यानं महिलेसोबत गुपचूप दुसरे लग्न केलं होतं. त्यानं हत्येची कबुली दिली आहे. आता त्याची पहिली पत्नी अपर्णा प्रियदर्शिनी हिच्या कुटुंबियांनीही पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
वाहतूक पोलीस हवालदार असलेल्या शुभमित्रा साहू हिची हत्या तिचा पती दीपक राऊत याने केल्याचे समोर आले आहे. दीपक राऊत याचे पाहिले लग्न अपर्णा प्रियदर्शिनी हिच्यासोबत झाले होते, पण २०१९ मध्ये अपर्णा यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. मात्र, आता त्यांच्या कुटुंबीयांना घातपाताचा संशय आहे. कारण अपर्णा आणि शुभमित्रा या दोघींना प्रत्येकी एक कोटी रुपयांचे विमा संरक्षण होते. अपर्णाच्या मृत्यूनंतर दीपकला एक कोटी रुपयांची विमा रक्कम मिळाली होती. आता शुभामित्राची हत्या करून एक कोटी रुपये मिळवण्याचा प्रयत्न होता. अपर्णाची धाकटी बहीण रोझलिन राऊतने सांगितलं की, सुरुवातीला, आम्हाला तो अपघात वाटला. आता दीपकची दुसरी बायको शुभमित्रा साहू यांच्या हत्येनंतर, माझ्या बहिणीचीही दीपकनेच हत्या केली असावी, असा आम्हाला संशय आहे. मी माझ्या बहिणीच्या मृत्यूची पुन्हा चौकशी करण्याची मागणी करत धेनकनाल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. दिपकने शुभाच्या हत्येबाबत कबुली देताना सांगितले की, दीपकनं शुभमित्राला तिच्या कार्यालयातून सोबत घेतलं. त्यानंतर दुपारी २ ते ३ च्या दरम्यान तिची गळा दाबून हत्या करण्यात आली. यानंतर दीपकनं तिचा मृतदेह दिवसभर गाडीत ठेवला. भुवनेश्वरपासून १७० किलोमीटर दूरवर क्योंझर जिल्ह्यातील घाटगाव परिसरातील जंगलात नेऊन गाडला. मग तो घाटगावातील तारिणी मंदिरात गेला. तिथे जाऊन त्यानं प्रार्थना केली, सेल्फीही काढले होते. दरम्यान पत्नीच्या हत्येच्या आरोपांमुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या दीपक राऊतच्या पहिल्या पत्नीच्या मृत्यूचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राऊतच्या अडचणीत वाढ झाली आहे.
दीपकनं शुभमित्राकडून १० लाख रुपये घेतले होते. शुभमित्रा त्याच्याकडून पैसे परत मागत होती. या पैशातून तिला दीपक सोबत लग्न करायचं होतं. समाजासमोर लग्न करुन तिला दीपकसोबत नांदायचं होतं. त्यासाठी तिनं दीपककडे १० लाख रुपये परत करण्यासाठी तगादा लावला. त्यामुळे सांतापलेल्या दिपकने शुभाची हत्या केली होती.