आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या हडपसरमधील काॅलेजमध्ये धक्कादायक प्रकार
काॅलेजच्या टाॅललेटमध्ये तरुणीसोबत अमानुष प्रकार, आरोपी अद्यापही मोकाट
पुणे दि १४(प्रतिनिधी)- राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या पुण्यातील हडपसर हांडेवाडी रोड येथील जेएसपीएम कॉलेजमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका नराधमाने कॉलेजमधील लेडीज हॉस्टेलच्या टॉयलेटमध्ये घुसून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे कॉलेजसह शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तानाजी सावंत यांच्या जेएसपीएम कॉलेजमधील मुलींच्या होस्टलमध्ये गेल्या काही दिवसांपासून स्वछातागृहाचं सुरु होतं. त्यामुळे तिथे काही कामगार काम करत आहेत. त्यापैकी एका कामगाराने एक तरुणी टॉयलेटमध्ये गेली असता लेडीज टाॅयलेटमध्ये घुसत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिने त्याला विरोध केल्यानंतर त्याने तेथून पळ काढला. या घटनेप्रकरणी वानवडी पोलीस स्टेशनमध्य अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे.
खुद्द आरोग्यमंत्र्यांच्या शिक्षण संस्थेत असा प्रकार घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली असून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. घटनेला दोन दिवस झाले असून आरोपीचा शोध सुरु आहे.नराधमावर कठोर कारवाई करण्याची मागणी मुलींच्या कुटुंबीयानी केली आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.