धक्कादायक! आंबा खाल्ल्याने विवाहित महिलेचा मृत्यू
परिसरात अनेकांना त्रास, उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, पोस्टमार्टम अहवालातुन होणार मृत्यूचा खुलासा?
इंदूर दि १२(प्रतिनिधी)- आंबा खाल्ल्यानंतर एका नव विवाहित तरुणीची प्रकृती अचानक बिघडली. यानंतर घरच्यांनी तिला रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची घटना मध्यप्रदेशमध्ये घडली आहे. इंदूरमधील राजेंद्र नगर ठाण्याच्या क्षेत्रातील बिजलपूर येथेही घटना घडली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
अर्चना अटेरिया असे मयत महिलेचे नाव आहे. अर्चना नेहमीप्रमाणे काल रात्री उशिरा जेवली. जेवल्यानंतर तिने आंबा खाल्ला. पण त्यानंतर तिला त्रास होऊ लागला. तिला वाटले आराम केल्यानंतर त्रास कमी होईल. पण त्रास वाढू लागल्याने घरच्यांनी तिला तातडीने रूग्णालयात दाखल केले. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. अर्चनाच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार आंबे खाल्यानंतर अनेकांची तब्येत ढासळली होती. आजकाल फळे विषारी रसायनाने शिजवली जातात. ज्या दिवशी ही घटना घडली त्याच दिवशी आमच्या परिसरात आणखी काही घटना घडल्या होत्या त्यामुळे विषारी आंबे खाल्ल्याने सुनेची तब्येत बिघडल्याचे दिसते असा दावा अर्चनाच्या सासरे बन्सीलाल यांनी केला आहे. दरम्यान आंबा सर्वांच्या आवडीचे फळ असते. पण तोच आंबा तरुणीच्या जीवावर बेतला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चना आंबे खाल्ल्यानंतर आजारी पडली होती. यानंतर कुटुंबीयांनी तिला खासगी रुग्णालयात दाखल केलं. जिथे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल. मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.