Latest Marathi News
Ganesh J GIF

धक्कादायक! आमदाराचा बंदुकीतील गोळी लागून मृत्यू

आमदार अनेक कारणांमुळे नेहमीच चर्चेत, मुख्यमंत्र्यांनीही केलेला प्रचार, काय घडले?

लुधियाना – पंजाबमधील लुधियाना पश्चिम विधानसभा मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे (आप) आमदार गुरप्रीत गोगी यांचा गोळी लागून मृत्यू झाला. ही घटना मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. गोगी यांना ही गोळी नेमकी कशी लागली, याची नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाही.

गुरप्रीत गोही हे गोळी लागून गंभीर जखमी झाल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना लुधियानामधील दयानंद मेडिकल कॉलेजमध्ये उपचारांसाठी दाखल केले. मात्र शुक्रवारी रात्री १२च्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. डीसीपी जसकरण सिंह तेजा म्हणाले की, कुटुंबातील सदस्यांच्या मते, त्याने चुकून स्वतःवर गोळी झाडली. त्याच्या डोक्याला गोळी लागली आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. आपचे आमदार गुरप्रीत बस्सी गोगी यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. घटनेनंतर त्याचा मृतदेह डीएमसी रुग्णालयाच्या शवगृहात ठेवण्यात आला आहे. शनिवारी पोस्टमॉर्टम केले जाणार आहे. गुरप्रीत गोगी हे २०२२ मध्ये आम आदमी पक्षात सामील झाले होते. त्यांनी दोन वेळा काँग्रेसचे आमदार राहिलेले भारत भूषण आशु यांचा पराभव करून लुधियाना येथून विधानसभा निवडणूक जिंकली होती. आपचे जिल्हा सचिव परमवीर सिंह यांनी सांगितले की, आमदार दिवसभरातील त्यांच्या नियमित कार्यक्रमांनंतर घुमर मंडी येथील त्यांच्या घरी परतले होते. ते त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्या कुटुंबासोबत होते. प्राप्त माहितीनुसार, गोगी यांच्या पत्नी डॉ. सुखचैन कौर गोगी यांनी गोळीबाराचा आवाज ऐकला आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

गुरप्रीत सिंह हे अनेकदा त्यांच्याकडील असलेल्या रंगीबेरंगी कारमुळे चर्चेत आलेले आहेत. २०२२ मध्ये विधानसभेचा निवडणूक अर्ज भरण्यासाठी ते जुनी पांढऱ्या रंगाची स्कूटर घेऊन आले होते. ही स्कूटर माझ्यासाठी किमयागार आहे, असं त्यांनी म्हटलं होते. मुख्यमंत्री भगवंत मान हे देखील सुखचैन यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!