धक्कादायक! केवळ ३५० रूपयांसाठी चाकून भोसकून हत्या
हत्या करतानाचा व्हिडिओ व्हायरल, तब्बल ५० वार, हत्या केल्यानंतर डान्सही केला, आरोपीच्या कृत्याने दहशतीचे वातावरण
दिल्ली दि २६(प्रतिनिधी)- दिल्ली देशाची राजधानी आहे. पण आता ती क्राईम कॅपिटल देखील होताना दिसत आहे. कारण दिल्लीत गुन्हेगारी घटना वाढत आहेत. दिल्लीच्या ईशान्य भागात एका १६ वर्षीय मुलाने १७ वर्षीय तरुणाची चाकूने भोकसून निघृणपणे हत्या केली आहे. पण यावेळी गुन्हेगाराने तब्बल ६० वेळा तरुणाला भोसकले आहे. याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. तसेच नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
दिल्लीत १६ वर्षांच्या मुलाने १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलाची एका गल्लीत चाकूने भोसकून हत्या केली. आरोपीने अल्पवयीन मुलाच्या छातीवर आणि मानेवर चक्क ६० वेळा वार केले.आरोपीने त्या मुलाची मान कापण्याचा देखील प्रयत्न केला. केवळ ३५० रुपयांसाठी ही हत्या करण्यात आली आहे. बिर्याणीसाठी आरोपीने तरुणाला अडवले होते. पण पैसे देण्यास नकार दिल्यानंतर ही हत्या करण्यात आली. आरोपीने त्या तरुणाच्या डोक्यावर लाथा देखील मारल्या. हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, आरोपी तरुणाच्या मानेवर वारंवार वार करत आहे. तसेच हल्लेखोर पीडितेच्या डोक्यावर अनेक वेळा लाथ मारताना देखील दिसतोय. कमाल म्हणजे आरोपी यावेळी मृतदेहासमोर बीभत्स नाचताना दिसत आहे. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन आरोपी विरोधात गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त करण्यात आला आहे. हल्ल्याच्या वेळी मारेकरी दारूच्या नशेत होता, असं पोलिसांनी सांगितलं. मारेकरी जाफ्राबाद इथला रहिवासी असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पोलीस हत्या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
रामराज #Delhi में गले पर चाकू से 60 बार किया वार… मर्डर के बाद खूब किया डांस⚠️👇
दिल्ली के वेलकम इलाके में 21 नवंबर की रात 17 वर्षीय यूसुफ की हत्या कर दी गई😑
हत्यारोपी भी नाबालिग है😐
इसने बिरयानी के लिए 350 रुपए मांगे थे यूसुफ ने मना किया तो चाकू से गोदा डाला😐 pic.twitter.com/1HcKWB8gbJ— Tabish Khan 🇮🇳 (@tabishkhanss) November 23, 2023
शवविच्छेदन अहवालात तरुणाच्या मानेवर, कानांवर आणि चेहऱ्यावर चाकूनं वार केल्याच्या खुणा आहेत. मृत तरुणाच्या शरीरावर चाकूनं वार केलेल्या ५० खुणा आढळून आल्या आहेत. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्याने संपूर्ण देश हादरला आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर असणार आहे.