
धक्कादायक! जमावाची या खासदाराला बॅटने मारहाण
पोलिसांना वाचवण्यासाठी केला गोळीबार, सुरक्षा रक्षकावरही हल्ला, व्हिडीओ व्हायरल
गुवाहाटी – काँग्रेस खासदार रकीबुल हुसेन आणि त्यांच्या वैयक्तिक सुरक्षा अधिकाऱ्यांवर मुखवटा घातलेल्या लोकांनी हल्ला केला. तसेच खासदारावर बॅटने हल्ला करण्यात आला. खासदाराच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सैनिकांनी हवेत गोळीबार करून त्यांचे प्राण वाचवले.
आसाममधील नागाव जिल्ह्यातील रूपोही येथेही घटना घडली. काँग्रेस खासदार रकीबुल हुसेन आणि त्यांच्या मुलावर जमावाने हल्ला केला. खासदारावर जमावाने केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. खासदार हे आयोजित कार्यकर्ता बैठकीला उपस्थित राहण्यासाठी जात होते. ते रस्त्यावर असताना मुखवटा घातलेल्या जमावाने त्यांच्यावर हल्ला केला. व्हायरल व्हिडिओत दिसत आहे. फुटेजमध्ये एक हल्लेखोर हुसेन यांच्यावर बॅटने प्रहार करताना आणि नंतर पळून जाताना दिसत आहे. त्यानंतर उर्वरित हल्लेखोरांनी खासदाराच्या पीएसओवर हल्ला केला, एका अधिकाऱ्याने हवेत गोळीबार केला ज्यामुळे हल्लेखोर पांगले. हल्ल्यानंतर, मुख्यमंत्री सरमा यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितले होते की, खासदार जिल्ह्यात असताना, विशेषतः समगुरी आणि रूपाहीहाट भागात त्यांची सुरक्षा वाढवली जाईल. शुक्रवारी संपूर्ण विरोधी पक्षाने या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली आणि म्हटले की ही लोकशाहीची हत्या आहे आणि आसाममध्ये जंगल राज आणि गुंडा राज होऊ दिले जाणार नाही.
रकीबुल हुसेन हे आसामच्या धुबरी लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस खासदार आहेत. त्यांनी १० लाखांहून अधिक मतांच्या विक्रमी फरकाने विजय मिळवला होता. खासदार होण्यापूर्वी, रकीबुल हुसेन गेल्या २३ वर्षांपासून समगुरी विधानसभेतून जिंकत होते. मात्र पोटनिवडणुकीत रकीबुलच्या मुलाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.