
धक्कादायक! मा. गृहराज्यमंत्र्याच्या पुतण्याचा तरुणीवर बलात्कार
लग्नाचे खोटे आमिष दाखवून बलात्कार, गर्भपातही केला, मारहाणही केली, तरुणीचे गंभीर आरोप
ठाणे – राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या पुतण्याच्या विरोधात ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झााला आहे. पृथ्वीराज पाटील, असे गुन्हा दाखल झालेल्या सतेज पाटील यांच्या पुतण्याचे नाव आहे. एका २९ वर्षीय तरूणीने ही तक्रार दाखल केली आहे.
लग्नाचे खोटे आश्वासन देऊन 29 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार आणि मारहाण केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. पीडित तरुणीवर ठाणे, नवी मुंबई आणि प्रामुख्याने कोल्हापुरातील बंगल्यावर अनेक वेळा मारहाण देखील करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. तसेच तिला कोल्हापुरात गर्भपात करण्यास देखील भाग पाडल्याचा पृथ्वीराज पाटील यांच्यावर आरोप आहे. पीडित तरुणीने पृथ्वीराज पाटील यांच्याविरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी पृथ्वीराज पाटील यांची ओळख होती. या प्रकरणी पीडितेने 7 मार्चला कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या सर्व आरोपांनी राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. सदर रुग्णालयाचा अहवाल आणि चॅटिंगचा पुरावा पोलिसांकडे सादर केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी अद्याप या प्रकरणात कुणालाही अटक केली नाही.
आरोपी पृथ्वीराज हा संजय पाटील यांचा मुलगा असून डी.वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त देखील आहेत. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत. पण या प्रकरणामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.