चालु कार्यक्रमामध्ये मध्ये या प्रसिद्ध गायिकेवर गोळीबार
गायिकेवर रूग्णालयात उपचार सुरु, गोळीबार झाल्याने खळबळ, गायिकेच्या प्रकृतीचे अपडेट समोर
पटना दि १(प्रतिनिधी)- प्रसिद्ध भोजपुरी गायिका निशा उपाध्याय यांच्यावर कार्यक्रमादरम्यान गोळीबार करण्यात आल्याने खळबळ उडाली. ही घटना बिहारमधील छपरा येथे घडली. गायिका निशा उपाध्याय यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
निशा उपाध्याय यांच्या कार्यक्रमात काही लोकांनी हवेत गोळीबार केला. या गोळीबारात गाणे गात असलेल्या निशाच्या डाव्या पायाला गोळी लागली आहे. या घटनेत निशाला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्यांच्यावर पटना येथील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना बिहारमधील सारण जिल्ह्यात घडली आहे. गायिकेवर गोळीबाराच्या या घटनेनंतर चांगलीच खळबळ उडाली आहे. भोजपूरी गायिका निशा उपाध्यायवर झालेल्या गोळीबाराची पोलीस चौकशी करत आहेत. हा गोळीबार जाणूनबुजून करण्यात आलाय का याचा पोलीस शोध घेत आहेत. निशा उपाध्यायचा रुग्णालयातील फोटो समोर आला आहे. यामध्ये निशा रुग्णालयाच्या बेडवर दिसत आहे. एका हाताला सलाईन लावण्यात आले आहे.
डॉक्टरांनी निशा उपाध्यायवर शस्त्रक्रिया करून तिच्या पायातली गोळी काढल्याचे सांगण्यात येत आहे. निशा ही भोजपुरीमधील प्रसिद्ध गायिका असून ती लोकगीतांसाठी ती ओळखली जाते.