Latest Marathi News
Ganesh J GIF

दहावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींचीच बाजी

निकालात हा विभाग आघाडीवर तर हा विभाग पिछाडीवर, पाहा विभागनिहाय निकाल

पुणे दि २(प्रतिनिधी)- राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १० वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा निकाल ९३.८३ टक्के लागला आहे. यावर्षीच्या निकालामध्येही मुलींनी बाजी मारली आहे. दहावीमध्ये ९५.८७ टक्के मुली पास झाल्या आहेत. तर ९२.०५ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. सालाबादप्रमाणे यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे.

निकालामध्ये ९८.११ टक्क्यांसह कोकण विभाग पहिल्या स्थानावर आहे. तर सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा लागला आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेऊन १० वीचा निकाल आणि विभागवार टक्केवारी जाहीर करण्यात आली आहे. यंदाही दहावी परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. राज्यातील १०,००० शाळांचा निकाल हा शंभर टक्के लागला आहे. तसेच यंदाची विद्यार्थ्यांची गुणवारी ही बेस्ट ऑफ फाईव्ह नुसारच करण्यात आली आहे. विभागवार निकाल पहायचा झाल्यास कोकण-९८.११ टक्के, कोल्हापूर- ९६.७३ टक्के, पुणे- ९५.६४ टक्के, मुंबई- ९३.६६ टक्के, औरंगाबाद- ९३.२३ टक्के, अमरावती- ९३.२२टक्के, लातूर- ९२.६७ टक्के, नाशिक- ९२.२२ टक्के, नागपूर- ९२.०५ टक्के लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ३.११ टक्क्यांनी दहावीचा निकाल घटला आहे. राज्यातील ४३ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. तर १४ जून रोजी दुपारी विद्यार्थ्यांना आपली गुणपत्रिका प्राप्त होणार आहे. १०वी परीक्षाला एकूण १५ लाख २९ हजार ६६६ विद्यार्थी बसले होते त्यापैकी १४ लाख ३४ हजार ८९८ विद्यार्थी पास झाले आहेत. राज्यात १५१ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा २ ते २५ मार्च या कालावधीत पार पडली. परंतु मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचं निदर्शनास आलं आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची नोंदणी तब्बल ६१ हजार ७०८ ने कमी झाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!