
शो मॅन…फ्लाॅप शो… ते बच्चू ये तेरे बस की बात नही…
राष्ट्रवादी आणि शिंदे गटातील या नेत्यामध्ये 'का' जुंपली
मुंबई दि ५ (प्रतिनिधी)- राज्यातील नाट्यमय सत्तांतरानंतर खरी शिवसेना कुणाची यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात रस्सीखेच सुरू आहे.दसरा मेळावाही त्याला अपवाद नाही.पण आता राष्ट्रवादी आणि शिंदे गट आमनेसामने आले असुन अगदी फिल्मी डायलाॅग मारत एकमेकांवर आरोप केले जात असल्याने याची जोरदार चर्चा रंगली आहे.
ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात दसरा मेळाव्यावरून वाद आहेत. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, ज्यांच्या हातात सत्ता ते त्यांना पाहिजे असेल तसं करतात. त्यामुळे वाद घालून चालणार नाही. सर्वसामान्य जनता कुणाच्या पाठिशी आहे हे शिवाजी पार्कवरील सभा झाल्यावर कळेल, तसेच, निवडणुका झाल्यावर कुणाची शिवसेना खरी हेदेखील कळेल त्याच बरोबर आत्ताच मुख्यमंत्री ‘शो मॅन’ आहेत असा टोला लगावला होता.अजित पवारांनी केलेल्या टीकेला खासदार श्रीकांत शिंदे यांनी देताना “दादा हा ‘शो’ नाही, पहाटेच्या फ्लॉप ‘शो’सारखा. हा ‘शो’ले आहे, एव्हरग्रीन ब्लॉकबस्टरसारखा!” अस खोचक टोला लगावला होता. या टीकेला राष्ट्रवादी कडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.बच्चू ये तेरे बस की बात नही, असे म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी टिका केली.तसेच अजित पवार यांच्याबद्दल बोलताना भान ठेऊन बोला असा इशाराही त्यांनी दिला आहे.
शिवसेनेत बंड करताना एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी अजित पवार यांच्यावर टिका केली होती. त्यामुळे शिंदे गट विरूद्ध राष्ट्रवादी वाद आहेच अगदी सभागृहातही आणि बाहेरही अनेकवेळा हा वाद दिसून आला आहे. त्यामुळे आगामी निवडणुका जाहीर होऊन निकाल हाती येईपर्यंत आरोप प्रत्यारोपाची मालिका चालूच राहणार आहे.