Just another WordPress site

 ….म्हणून ‘या’ आईने मुलीच्या वर्गमित्राची केली हत्या

हत्येचे खरे कारण समोर येताच पोलीसांनाही बसला धक्का

पुदुच्चेरी दि ५ (प्रतिनिधी) – आपल्या मुलीपेक्षा जास्त हुशार असल्याने एका आईने मुलीच्या वर्गमित्राचीच हत्या केल्याची घटना पुद्दुचेरीतील कराईकल येते समोर आली आहे. सरबतामध्ये विष टाकून ही हत्या करण्यात आली. पोलीसांनी सगयारानी व्हिक्टोरिया या महिलेला अटक केली आहे.

GIF Advt

मणिकंदन हा वर्गातील सर्वांत हुशार विद्यार्थी होता.त्याला आरोपी महिलेच्या मुलीपेक्षा जास्त गुण मिळायचे. तो वर्गात प्रथम क्रमांकाने पास व्हायचा त्यामुळे महिलेने त्याची हत्या करण्याचे ठरवले घटनेच्या दिवशी शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलनात तीने शाळेतील शिपायाला आपण मणिकंदनची आई असल्याचं सांगून मणिकंदनसाठी दोन ग्लास सरबत पाठवले. कार्यक्रम संपला की त्याला हे सरबत दे, असे देखील तिने शिपायाला सांगितलं. पण सरबत पिल्यानंतर मणिकंदनला उलट्या होऊ लागल्या. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. पण त्याला अचानक ताप आला मात्र, उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. पण आईला सरबत पिल्याचे सांगितल्याने आरोपीपर्यंत पोहोचता आले.

पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सगयारानी हिला ताब्यात घेतलं गेलं. घरगुती औषध पाजलं असल्याने त्याला उलट्या झाल्या असतील असा दावा आरोपी महिलेने केला आहे. स्थानिक न्यायालयाने आरोपी महिलेला चौकशीसाठी पोलीस कोठडी सुनावणी आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!