
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू
हल्ल्यातील मृतांची यादी समोर, दहशतवाद्यांचा पहिल्यांदाच पर्यटकांवर हल्ला, नंदनवनात रक्ताचा सडा
श्रीनगर – काश्मीरमध्ये गेल्या सहा वर्षांतील सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. यावेळी प्रथमच अतिरेक्यांनी स्थानिकांऎवजी पर्यटकांना लक्ष्य केले. या हल्ल्यात किमान २७ पर्यटकांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. यात महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांचा समावेश आहे. आधी महाराष्ट्रातील ४ पर्यटकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होत. त्यानंतर आता महाराष्ट्रातील आणखी दोन पर्यटकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. काश्मीच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांमध्ये दोन परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. मार्चमध्ये झालेल्या बर्फवृष्टीनंतर शेकडोंच्या संख्येनं पर्यटक काश्मीरमध्ये फिरायला येतात. यावर्षीही अनेक पर्यटक वाढल्यानं सर्वसामान्य काश्मिरी नागरिक आनंदात होते. या हल्ल्यात अतिरेक्यांनी आधी पर्यटकांना त्याचे नाव,धर्म विचारलानंतर त्यांच्यावर गोळ्यांची बरसात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलीसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांना गाठून त्यांना नाव आणि धर्म विचारला. त्यानंतर पर्यटकांना कलमा म्हणायला सांगितला. कलमा म्हणता न आलेल्या पर्यटकांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या संघटनेचा उपप्रमुख सैफुल्लाह खालिद हा दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. या सैफुल्लाहचे हाफिज सईदशीही संबंध आहेत आणि भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचे नाव सामील आहे. यावेळी दहशतवाद्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल देखील अपशब्द वापरले. दरम्यान अमित शहा यांनी तातडीने श्रीनगरचा दाैरा करत परिस्थितीची पाहणी केली. तसेच याचे प्रत्युत्तर देण्यात येईल, असा इशारा सरकारने दहशतवाद्यांना दिला आहे.
पर्यटक मृत यादी
1. मनोज नाथ (कर्नाटक)
2. शिवम मोगा (कर्नाटक)
3. लेफ्टिनेंट विजय नरवाल (हरियाणा)
4. शुभम द्विवेदी (यूपी)
5. दिलीप डेसले (महाराष्ट्र)
6. अतुल मोहने (महाराष्ट्र)
7. सय्यद हुसैन शाह (अनंतनाग)
8. सुदीप नेपाने (नेपाल)
9. बिटन अधकेरी उधवानी कुमार (यूएई)
10. संजय लेले
11. हिम्मत
12. प्रशांत कुमार
13. मनीष रंजन (हैदराबाद)
14. रामचंद्रन
15. शैलेंद्र कलिप्या
16. दिनेश मिरानिया (छत्तीसगढ़)