Latest Marathi News
Ganesh J GIF

मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत साप घुसल्याने उडाला गोंधळ

मुख्यमंत्र्यांच्या पायाजवळ साप, उपस्थितांमध्ये गोंधळाचे वातावरण, मुख्यमंत्र्यांच्या कृतीची चर्चा

रायपूर दि २१(प्रतिनिधी)- आज नागपंचमी आहे. आज सर्वत्र नागाची पूजा केली जाते. पण याच सापामुळे मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत चांगलाच गोंधळ उडाला होता. यावेळी उपस्थितांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, घटनास्थळी असलेल्या लोकांना मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सापाला मारू नका असे आवाहन केले. पण या प्रकारची जोरदार चर्चा होत आहे.

मुख्यमंत्री भूपेश बघेल बिलासपूरमध्ये पत्रकरांना माहिती देत असताना अचानक साप त्यांच्या पायापर्यंत आला. सापाला पाहाताच तिथे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यांनी लोकांना सापाला मारू नका असे आवाहन केले. तसेच, हे एक पिरपिटी आहे. काळजी करू नका. त्याला मारू नका, असे मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी नागपंचमीच्या शुभेच्छा दिल्या. नागपंचमीच्या शुभ सणानिमित्त राज्यातील सर्व रहिवाशांचे अभिनंदन आणि शुभेच्छा. आपल्या सर्वांवर महादेवाची कृपा असावी. सर्वांच्या आयुष्यात सुख-समृद्धी यावी”, अशा शब्दांत मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान सप्टेंबर महिन्यात काँग्रेस नेते राहुल गांधी छत्तीसगड दौऱ्यावर येणार आहेत. याची तयारी पाहण्यासाठी बघेल आले होते. राहुल गांधी यांच्या दौऱ्यात कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा आयोजित केला जाणार आहे. यात लाखो कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. छत्तीसगडमध्ये यावर्षीच विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री भूपेश बघेल जोरदार तयारीला लागले आहेत. दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषेदत साप घुसला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या घरातही सापाचे दर्शन झाले होते.

छत्तीसगडमध्ये सलग तीनवेळच्या भाजप सरकारला धक्का देत २०१८ मध्ये काँग्रेस सत्तेत आलं. पक्षाने भूपेश बघेल यांना मुख्यमंत्रीपद दिले. काँग्रेसला हटवून पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजपनेही तयारी सुरु केली आहे. छत्तीसगडमध्येही महाराष्ट्राप्रमाणे काका पुतणे लढत पहायला मिळणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!