Latest Marathi News
Ganesh J GIF

…तर मुंबई हातातून गेली म्हणून समजा; राज ठाकरे यांच्या इशाऱ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

मुंबई महापालिकेत ठाकरे बंधुंची युती होणार हे जवळपास निश्चित झाल आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यावर महाविकास आघाडीत बिघाडी होणार असल्याची चर्चा आहे. कारण मनसे सोबत न जाण्यावर काँग्रेसचे नेते ठाम आहेत. मात्र, या सगळ्यात उद्धव ठाकरेंची मात्र कोंडी झाली. उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेत काँग्रेसला सोबत घेण्यासाठी आग्रही आहेत. त्यासाठी ठाकरे काँग्रेसच्या हायकमांडच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे मनसेला सोडा आणि काँग्रेस सोबत या अशी नवी ऑफर काँग्रेसने ठाकरेंना दिल्याचीही माहिती सुत्रांकडून मिळतेय. अशातच राज ठाकरे यांच्या इशाऱ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

मराठी माणसासाठी शेवटची मुंबई महानगरपालिका निवडणूक आहे अस समजा. रात्र वै-याची आहे गाफील राहू नका, आजूबाजूला लक्ष ठेवा असं आवाहन, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील मतदारांना केलं आहे. परळमध्ये मनसेतर्फे आयोजित कोकण महोत्सवात ते बोलत होते. मतदार यादीवर लक्ष ठेवा, गाफील राहिलो तर मुंबई हातातून गेली म्हणून समजा असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

शत्रू सत्तेत आहेत. आत्मसंतुष्ट राहू नका. तुमच्या सभोवतालच्या परिस्थितीवर लक्ष ठेवा. राजकारण कसे चालले आहे, मतदार यादीत काय चालले आहे यावर लक्ष ठेवा. मतदार खरे आहेत की बनावट? तुम्हाला याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. मराठी लोकांसाठी, ही येणारी मुंबई महानगरपालिका निवडणूक ही शेवटची निवडणूक असेल. जर आपण आत्मसंतुष्ट राहिलो तर महानगरपालिका आपल्या हातातून निसटून जाईल. म्हणून आत्मसंतुष्ट राहू नका. मला फक्त एवढेच सांगायचे आहे. जर मुंबई आपल्या हातातून निसटली तर हे लोक गोंधळ निर्माण करतील असे राज ठाकरे म्हणाले.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचा धुरळा उडायला सुरूवात झालीय. या निवडणुकांआधी मतदारयाद्यांमधील घोळ सुधारण्याची मागणी विरोधकांनी केली होती. यासाठी विरोधकांनी राज्य निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा ही काढला होता. विरोधक दुबार मतदारांचा मुद्दा आक्रमपणे मांडताहेत. त्यातच मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर आता गुरुवारी मतदारांची यादीही प्रसिद्ध करण्यात आली. 2017मधील निवडणुकीच्या तुलनेत यंदा 11 लाख 80 हजार 191 मतदारांची वाढ झाल्याचे दिसत आहे. आता पुढील काळात वॉर्डनिहाय किती मतदार वाढले, ते स्पष्ट होईल. यावरून आता विरोधकांनी शंका उपस्थित करायला सुरूवात केलीय. या सगळ्याची वॉर्डनिहाय पडताळणी सुरू केल्याची माहिती मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिली. तर जाहिर करण्यात आलेल्या मतदार याद्या या सदोष आहेत. त्यावर आम्ही हरकती सादर करणार असल्याचं शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!