Latest Marathi News
Ganesh J GIF

…म्हणून पतीने पत्नीचा गळा आवळून केला खून

खुन करणाऱ्या पतीला पोलीसांनी ठोकल्या बेड्या, असा लावला छडा

कराड- जास्त बोलत असल्याच्या रागातून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना कराड येथे घडली आहे. कराड तालुक्यातील विंग गावातील विंग हॉटेल परिसरात ही घटना घडली असून, संशयित पतीला तालुका पोलिसांनी गजाआड केले आहे.

मयुरी मयूर कणसे असे मृत पत्नीचे नाव असून, पती मयूर यशवंत कणसे असे पतीचे नाव आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात विशाल सदाशिव कणसे याने पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड तालुक्यातील विंग येथील मयुर कणसे याचे मयुरी यांच्याशी २०१८ मध्ये विवाह झाला होता. त्यानंतर एकाच वर्षात त्याच्यात वाद सुरू झाले. घरातील लोकांशी पटत नसल्याची तक्रार मयुरी करत होती. मयुरीचे नेहमीच घरातील लोकांसोबत खटके उडत होते. या सततच्या वादामुळे ती नवऱ्याला सोडून माहेरी गेली होती. पण नंतर वेगळे राहण्याची तयारी दाखवल्यानंतर मयूरी परत पतीसोबत राहण्यास आली होती. तेथेही त्याच्यात सतत वाद व्हायचे. तसा वाद ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीही सुरू होता. त्यावेळी रागाच्या भरात मयुरने पत्नीला मारहाण केली. त्या रागातच त्याने पत्नीचा गळा आवळून खून केला. घटनेनंतर मयुरने सर्व माहिती चुलत भाऊ विशाल कणसे याला सांगितली. त्यामुळे कणसे याने तिथे धाव घेतली. मात्र, तिची काही हालचाल दिसत नव्हती. त्यावेळी गावातील काही जणांच्या मदतीने मयुरीला कारमधून येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण उपचाराआधीच पोलीसांनी मयुरीला मृत जाहीर केले.

पोलिसांनी संशयित पती मयुरला अटक केली आहे. पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, पोलीस निरिक्षक महेंद्र जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली आहे. नवऱ्याने बायकोचा गळा दाबून काटा काढल्याच्या घटनेनं कराड हादरले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!