…म्हणून दिवाळीत लाल परीचा प्रवास महागला
एसटीच्या तिकीटात एवढ्या टक्यांची वाढ, प्रवाशांच्या खिशाला फटका
मुंबई दि १४(प्रतिनिधी)- दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची माहिती आहे.गावी जाणार असाल तर तुमच्या खिशाला जास्तीची झळ बसणार आहे. कारण दिवाळीनिमित्त एसटीच्या भाडेवाढ सुत्रानुसार तिकीटाच्या दरात दहा टक्के वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ दिवाळीपुरती असणार आहे.
यंदाची एसटीची दरवाढ शुक्रवारी म्हणजेच २१ आॅक्टोबरला मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. मध्यरात्री बारानंतर नंतर प्रवास सुरु करणा-या प्रवाशांना १० टक्के वाढीव दराने भाडे आकारणी करण्यात येईल. ही भाडेवाड ३१ ऑक्टोबर, २०२२ पर्यत राहील. पण ही भाडेवाढ परिवर्तन,हिरकणी, शिवशाही आणि शयन आसनी बसेसला लागू राहील. शिवनेरी आणि अश्वमेध या बसेसला ही भाडेवाड लागू राहणार नाही. तसेच ज्यांनी २१ तारखेनंतरचे तिकीट अगोदरच काढले असेल त्यांनाही वाढीव दरानंतरचा फरक द्यावा लागणार आहे. एसटीची ही हंगामी दरवाढ ३० आॅक्टोबर पर्यंत असणार आहे.१ नोव्हेंबरपासून एसटी तिकिटाचे दर पूर्वीप्रमाणे होतील. एसटी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सुत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसुल वाढीच्या दृष्टीने ३० टक्क्यापर्यत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीला दिला आहे.
दिवाळीनिमित्त महामंडळाने यंदा राज्यभरात ‘दिवाळी स्पेशल’ १४९४ जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २१ ते ३१ आॅक्टोबर दरम्यान या गाड्या धावणार आहेत.प्रवाशांची वाढती गर्दी पाहून टप्प्या-टप्प्याने गाड्यांची संख्याही वाढविण्यात येणार आहे.त्यामुळे यंदाची दिवाळी उत्साहात साजरी करता येणार आहे.