
…म्हणून कुंभमेळ्यातील व्हायरल साध्वी रडू लागली
व्हायरल साध्वीचा रडतानाचा व्हिडिओ व्हायरल, कारणही सांगितले, नेमक काय म्हणाली?
प्रयागराज- महाकुंभच्या सुरुवातीपासून हर्षा रिछारिया हे नाव सध्या जोरदार चर्चेत आहे. सोशल मीडियावर हर्षा यांना सर्वात सुंदर साध्वी असे नाव मिळाले होते. हर्षा यांचा कुंभमधील एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रत्येकालाच त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा होती. पण आता हर्षाने मोठा निर्णय घेतला आहे.
हर्षाने भगवी वस्त्रे परिधान केली आणि ती रथात बसली म्हणून संतांनी आक्षेप घेतला. हा वाद इतका वाढला की, हर्षाने शेवटी महाकुंभ सोडून जाण्याचा निर्णय जाहीर केला. हर्षाने एक्स (पूर्वीचे ट्वीटर) अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती रडत असल्याचे दिसत आहे. हर्षाने कुंभ मेळा सोडून जाण्यामागचं कारण सांगितलं आहे. ती म्हणाली, एक मुलगी धर्म आणि सनातन संस्कृती समजून घेण्याचा प्रयत्न करतेय. तर तुम्ही तिच्यावर अशी वेळ आणली की तिने कुंभ मेळ्यातून निघून जावं. लोकांना या गोष्टीची लाज वाटायला हवी. आयुष्यात एकदाच महाकुंभ मेळा अनुभवण्याची संधी मिळते. तुम्ही एका व्यक्तीची कुंभ मेळा अनुभवण्याची संधी हिरावून घेतली. असं करणाऱ्यांना पाप लागेल. त्यांना कुंभमध्ये येण्याचं पुण्य मिळणार नाही. इथे काही लोकांनी मला संस्कृतीबद्दल जाणून घेण्यापासून परावृत्त केलं. माझी चूक काय आहे ? दिवसभर या कॉटेजमध्ये बसून राहण्यापेक्षा मी इथून निघून जाणंच योग्य आहे. हर्षा रिछारिया खरं तर एक महिना महा कुंभ मेळ्याचा अनुभव घेण्याच्या तयारीने आले होती. पण दोन -तीन दिवसांमध्येच तिला हा मेळा सोडून जावं लागत आहे. माझ्यासोबत माझ्या गुरुंचाही अपमान झाल्याचं हर्षाचं म्हणणे आहे. पाश्चात्य संस्कृती सोडून सनातन संस्कृतीचा स्वीकार करणं गुन्हा आहे का ? असा प्रश्न हर्षाने विचारला आहे.
https://x.com/Host_harsha/status/1879879226826150123?t=YILx9fe6P4KGfxYdEopKug&shttps://x.com/Host_harsha/status/1879879226826150123?t=YILx9fe6P4KGfxYdEopKug&s=19
हर्षा रिछारिया ही उत्तराखंडमधली तरुणी आहे. तिचे मुळ घर मध्य प्रदेशमधील भोपाळमध्ये आहे. हर्षाने इन्स्टाग्रामवर ती एक अँकर, मेकअप आर्टिस्ट, समाजसेवक, सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर आणि ट्रॅव्हल ब्लॉगर असल्याचं लिहिलं आहे. हर्षाचे इन्स्टाग्रामवर १.६ मिलियन फॉलोअर्स आहेत.