Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यात शिकणाऱ्या सोशल मीडिया एन्फ्लुअन्सर तरुणीला अटक

ऑपरेशन सिंदूरवरील पोस्टनंतर वादंग, भाजपासह काँग्रेसकडूनही कारवाईचा निषेध, कोण आहे शर्मिष्ठा?

दिल्ली – पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबविले. त्यावर शर्मिष्ठा पनोली या सोशल मिडीया इन्स्फलुर तरुणीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. आता त्यामुळे तिला बंगाल पोलीसांनी अटक केली आहे.

शर्मिष्ठा पनोली ही मुळची कोलकाता येथील असून ती सध्या पुण्यात कायद्याचे शिक्षण घेत आहे. ती पदवीच्या चौथ्या वर्षात शिकत आहे. तिचे इंस्टाग्रामवर ८० हजार हून अधिक फॉलोअर्स आहेत. १४ मे रोजी तिने एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यात तिने ‘ऑपरेशन सिंदूर’वर बॉलिवूड कलाकारांच्या मौनावर टीका केली होती. या व्हिडिओत तिने इस्लाम आणि पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने केली होती, ज्यामुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या व्हिडीओनंतर काही जणांनी तिच्यावर टीका केली. इतकेच नाही तर तिला जिवे मारण्याच्या धमक्या देखील मिळू लागल्या होत्या. त्यानंतर तिने तो व्हिडीओ डिलिट केला आणि जाहीरपणे बिनशर्त माफी मागितली. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये शर्मिष्ठा म्हणाली होती की, “या प्रकरणी मी बिनशर्त माफी मागते. मी जे काही मांडले त्या माझ्या वैयक्तिक भावना आहेत. मी कधीही कोणालाही जाणूनबुजून दुखावू इच्छित नव्हते, म्हणून जर कोणी दुखावले असेल तर मी त्याबद्दल माफी मागते. पण आता पोलीसांनी तिला अटक केली असून तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान अभिनेत्री-राजकारणी कंगना रणौतने अटक केलेल्या इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर शर्मिष्ठा पानोलीची तात्काळ सुटका करण्याची मागणी केली आहे. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी शर्मिष्ठा पनोली हिला पाठिंबा दिला आहे, तसेच तिची सुटका करण्याची मागणी केली आहे.

सोशल मीडियात शर्मिष्ठाच्या सुटकेसाठी कॅंपेन सुरू झाले आहे. राजकीय नेत्यांसह अनेकांनी तिच्या सुटकेची मागणी करत आंदोलनाचा इशाराही दिला आहे. तसेच भाजप, काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर जोरदार आसूड ओढले आहेत. त्यामुळे बंगाल सरकार अडचणीत आले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!