Latest Marathi News

मुलीला प्रियकरासोबत पाहताच आईने केले असे काही

नागपूरमधील या घटनेने खळबळ, पोलीसांनी केली कारवाई

नागपूर दि २९(प्रतिनिधी)- समाजात आजकाल अनैतिक संबंधाचे प्रमाण वाढले आहे. किशोर अवस्थेत असणारी मुलेही प्राैढासारखे वागू लागले आहेत. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. असाच एक प्रकार नागपूरमध्ये समोर आला आहे. नववीत शिकणाऱ्या आपल्या मुलीला आईने प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिल्याने त्यांना चांगलाच चोप दिला आहे. शिवाय मुलीच्या प्रियकराविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसांनी आशिष विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आशीष हा कुही तालुक्यातील एका गावात राहतो. तो आयटीआयचे शिक्षण घेत आहे.त्याचे त्याच भागात राहणाऱ्या एका मुलीसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले.दोघांची संमती असल्यामुळे त्यांच्या भेटीगाठी वाढु लागल्या. पण दोघांच्याही कुटुंबीयांना त्यांच्या प्रेमप्रकरणाबाबत माहिती नव्हती. घटनेच्या दिवशी मुलगी घरी अभ्यास करत होती. परीक्षा जवळ आल्याने तिच्या अभ्यासात अडचण नको म्हणून आई तिच्या भावाला घेऊन बाहेर गेली. ही संधी साधत तिने आशिषला घरी बोलावले. तोही तिच्या घरी पोहोचला. पण मुलीच्या आईला अचानक एक काम आठवल्याने ती घरी आली तेंव्हा तिने आपल्या मुलीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिले.त्यामुळे संतापलेल्या आईने आशीषची आणि मुलीची चांगलीच धुलाई केली आहे.

आईने मुलीसोबत कुही पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मुलीने आशीषने बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची माहिती दिली. पोलिसांनी तक्रारीवरून आशीषविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.या घटनेमुळे खळबळ उडाली असुन पालकांनी आपल्या पाल्यावर लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!