
लग्नात नवरदेवाने हार घालताच नवरीने केले असे काही…
नातेवाईक हैराण, नवरदेवाची अशी रिअॅक्शन, लग्न सोहळ्यातील हा व्हिडिओ बघाच!
मुंबई – लग्नाचे बरेच व्हिडीओ व्हायरल असतात. हळद, मेहंदी, संगीत किंवा मुलीला निरोप देतानाचे व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असतात. पण आता लग्नातील हार हालतानाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
आपला लग्न सोहळा खास आणि संस्मरणीय करण्यासाठी अनेक जोडपी डान्स किंवा आश्चर्यचकित करण्याचा प्रयत्न करत असतात. तर कोणी हटके एंट्री घेत असतो. पण सध्या सोशल मिडीयावर एक अनोखा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात तुम्ही पाहू शकता की, नवरदेवानं नवरीच्या गळ्यात हार घालताच नवरी इतकी खूश झाली आहे की ती “गुलाबी साडी आणि लाली लाले लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ …” या गाण्यावर डान्स करायला सुरूवात केली. सुरूवातीला लाजणारा नवरा नंतर तिला साध देताना दिसतो. नवरीचा डान्स पाहून तिथे असलेला प्रत्येकजण हैराण झालेला आहे तर नवरी सर्वांना विसरुन आनंदाने डान्स करत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ unaad_lekru नावाच्या इनस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.
सोशल माध्यमांचा वाढता वापर यामुळे जग जवळ आले आहे. त्यामुळे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओचे काैतुक होते, तर काही व्हिडिओवर टिका होते सध्या हा व्हिडिओ काैतुकासह जोरदार व्हायरल होत आहे.