भाजप आमदाराच्या मुलाला ४० लाखाची लाच घेताना रंगेहाथ अटक
घरात सापडले एवढे मोठे घबाड, लोकायुक्तच्या कारवाईने भाजप अडचणीत
बेंगलोर दि ३(प्रतिनिधी)- भाजप आमदाराच्या मुलाला लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. कर्नाटक लोकायुक्तांच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने गुरुवारी भाजप आमदार मदल विरुपक्षप्पा यांच्या मुलाला ४० लाखांची लाच घेताना अटक केली आहे. यामुळे कर्नाटकमध्ये खळबळ उडाली आहे.
प्रशांत मदल लाच घेताना पकडल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याच्या घरावर छापा टाकला, त्यावेळी घरातून ७.७ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. कर्नाटक निवडणुकीपूर्वी भाजप आमदाराच्या मुलाच्या घरातून एवढी मोठी रक्कम वसूल होणे भाजपसाठी अडचणीचे ठरणार आहे. मदल विरुपक्षप्पा हे कर्नाटक सोप अँड डिटर्जंट लिमिटेडचे अध्यक्ष आहेत. ही कंपनी म्हैसूर सँडल साबण तयार करते. त्यांचा मुलगा प्रशांत मदल हे बंगळुरू पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण मंडळाचे प्रमुख आहेत. ज्या व्यक्तीकडे लाच त्यांनी मागितली होती, त्याच व्यक्तीने प्रशांत यांच्यावरोधात तक्रार दाखल केली होती. कर्नाटकात साबण आणि डिटर्जंटच्या कच्च्या मालाचा पुरवठा करण्यासंदर्भातील टेंडरसाठी प्रशांतने 80 लाख रुपयांची मागणी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. लोकायुक्त पोलिसांनी या प्रकरणी तत्काळ कारवाई केली आहे. लोकायुक्त पोलिसांनी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई केली आहे.
Cash worth ₹8 crore has been recovered from the house of a BJP MLA in Karnataka.
His son was caught accepting a bribe of ₹40 lakh.#40PercentSarkara EXPOSED yet again!
— Ruchira Chaturvedi (@RuchiraC) March 3, 2023
कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट लिमिटेड कंपनीच्या अध्यक्षपदाचा भाजप आमदार मदल विरुपक्षप्पा यांनी राजीनामा दिला आहे. यावेळी बोलताना म्हणाले की, लोकायुक्तांच्या छाप्याशी माझा कोणताही संबंध नाही. हे माझ्या आणि माझ्या कुटुंबाविरुद्धचे षड्यंत्र आहे, परंतु माझ्यावर आरोप केले जात आहेत, त्यामुळे मी अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे.