Latest Marathi News
Ganesh J GIF

वाढदिवसाचा केक कापताना मित्रावर कोयत्याने वार

मित्रांनी मित्राच्या वाढदिवसाला न बोलविल्याच्या कारणावरून एकाने मित्रावर कोयत्याने वार केले. तसेच चार वाहनांची तोडफोड केली. ही घटना गुरुवारी (दि. २०) मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास ममतानगर, जुनी सांगवी येथे घडली.याप्रकरणी मयूर सुरेश गायकवाड (३०, रा. ममतानगर, जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अनिकेत गायकवाड (वय २३, रा. औंध, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गायकवाड त्यांचे मित्र अतुल पोंगडे यांच्या जनावरांच्या गोठ्याजवळ मित्र ओम मोरे यांच्या वाढदिवसाचा केक कापत होते. त्यावेळी संशयित आरोपी अनिकेत तिथे आला. त्याने मित्रांना शिवीगाळ करत ‘मला पार्टीला का बोलावले नाही’ असे म्हणत मित्राची दुचाकी फोडण्याचा प्रयत्न केला. त्यास गायकवाड यांनी अडवले. त्यानंतर अनिकेत याने फिर्यादी गायकवाड यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच त्याच्याकडे असलेला कोयता हवेत फिरवून फिर्यादीवर वार केले. त्यानंतर आरोपी अनिकेत याने सुमित सोनवणे यांची दुचाकी फोडली. ममतानगर, गल्ली क्रमांक चार येथून जात असताना त्याने आणखी दोन चार चाकी आणि एक दुचाकी वाहनाची तोडफोड केली.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!